रोपवे प्रकल्पाच्या जागेस स्थानिकांच्या कडाडून विरोध…
रामटेक – राजु कापसे
रामटेक कट मंदिर येथे प्रस्तावित रोकवेच्या जागेस स्थानिकांच्या वतीने कडाडून विरोध निदर्शनास येत आहे. नुकतंच दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी चौक रामटेक येथे रोपवेच्या प्रस्तावित जागेच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या चर्चासत्र संपन्न झाला सदर चर्चासत्रात उपस्थित सर्वपक्षीय नेते तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने सदर जागे संदर्भात आपापला आक्षेप नोंदविला.
सदर रोपवे प्रकल्प केंद्रीय मंत्री भारत सरकार नितीन गडकरी यांच्या मंत्रालयातून प्रकल्प मंजूर झालेला असून सदर प्रकल्प नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत कार्यरत असलेली नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड ही सरकारी कंपनी सदर रोपे चे प्रकल्प बांधकाम करणारी केंद्र सरकारची संस्था आहे. सदर प्रकल्प हा करपूर बावडी परिसर ते गड मंदिर सीतामाई रसोईघर इथपर्यंत 6 52 मीटर लांबीचा आहे सदर प्रकल्पाची किंमत 72 कोटी असून सदर कामाचे टेंडर सुद्धा झालेले असल्याचे समजते.
या प्रकल्पाकरिता लागणारी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदार रामटेक च्या माध्यमातून जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे आहे तसेच राज्य सरकारची समन्वय एजन्सी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग हे केंद्र सरकारच्या एन एच एल एम एल या संस्थे करिता समन्वय एजन्सी म्हणून काम करीत आहे.
चर्चासत्र दरम्यान सदर प्रकल्प रामटेकलाच झालाच पाहिजे अशी एकमताने मागणी आहेच परंतु सदर जागा ही रोपे प्रकल्पाकरिता हितकारक नाही त्यामुळे पर्यटक वाढवण्याचा जो दृष्टिकोन आहे तो यातून पूर्णपणे साध्य होणार नाही प्रसंगी रोजगाराचे स्त्रोत सुद्धा पाहिजे तसे यातून निर्माण होण्याची संभावना अजिबात दिसत नाही असे चर्चेतून पुढे आले .