रामटेक – राजू कापसे
शांतिनाथ मंदिरासमोरच्या मुख्य रस्त्यावर राष्ट्रकुलकालिनी मंदिर ‘कालंका देवी मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या रामटेक मंदिरांचे शहर म्हणूनही ओळख आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन स्पशनि पुनित झालेली रामनगरी पुराणात ‘तपोगिरी’ म्हणून नोंद ठेवून आहे.
श्रीअठराभुजा गणेश मंदिरामुळे वैदर्भीय अष्टविनायक हीदेखील ओळख प्राप्त झाली आहे. रामटेकचे धार्मिक महत्त्व
श्रीराम-जानकी, लक्ष्मण, वराह, त्रिविक्रम मंदिर, अंबकुंड (अंबाळा) या करून दिले आहे. विदर्भाची अयोध्या अशी ओळख त्यामुळेच मिळाली आहे.
रामटेक शहराच्या उत्तरेला असलेल्या या मंदिराविषयी असे सांगितले जाते की, रामटेकवर नागपूरकर रघुजीराजे भोसले यांचे राज्य असताना ते दररोज पूजेसाठी मंदिरात यायचे. त्यावेळी मंदिरात पितळी मुखवटा असलेली पाषाणात कोरलेली
माता कालंकाची मूर्ती होती.
आता तेथे संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. बांधकाम च्या दृष्टीने मंदिराचे दोन भाग पडतात. एक सभामंडप व दुसरे देवीगृह. देवीगृहात माता कालंकाची चार फूट उंचीची संगमरवरी मूर्ती आहे.
चेहरा हसरा असून हातात विविध शस्त्रे आहेत. मूर्तीच्या समोरच जुना पितळी मुखवटा आहे. मंदिर दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. मंदिरासमोर दीपस्तंभ आहे. मंदिराची जागृत अशी ख्याती असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी असते.
आजपासून साधारणतः पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी शहरातील स्व. मधुकरराव पिपरोदे यांच्या नेतृत्वात पूर्णतः पडलेल्या मंदिराची मधुकर सायरे, अरविंद आंबागडे, दयानंद रेवतकर, अनिल भोरसले, अरुण पोकळे, बबन क्षीरसागर, दुर्गेश खेडगरकर, दिलीप देशमुख, संजय गाडगीलवार, सुभाष बघेले, सुधाकर सायरे, संजय सोनकुसरे, किरण मेहर, चंद्रकांत ठक्कर, अशोक पटेल, जगदीश सायरे आणि इतरांनी डागडुजी केली.
त्याला सुंदर रूप दिले. तेव्हापासून मंदिरात शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र आदी उत्सव साजरे केले जाऊ लागले. आता तर वर्षभर भाविक मंदिरात मातेच्या दर्शनासाठी येतात. उत्सव समितीचे रितेश चौकसे, सुमित कोठारी, ऋषिकेश किंमतकर, अशोक सारंगपुरे, चिंतलवार, निर्भय घाटोळे, महेंद्र माकडे, सेवक नागपुरे, रमेश कोठारी, विनू ठक्कर, चेतन धुवाविया आणि इतर सर्व सदस्य उत्सवाच्या आयोजनात व्यस्त आहेत.