राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक : कविकुलगुरु इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी ॲन्ड सायंस रामटेक मध्ये डाटा सायंस व कृत्रिम बुद्धिमत्ता यामधे रोजगार संधी या विषयावर कार्यशाळा 27 सप्टेंबरला किट्सच्या छत्रपती शिवाजी सेमिनार हाल मधे आयोजित केली. कार्यशाळाचे उद्घाटन प्रमुख वक्ते व फायरब्लेज एआय स्कूल चे संस्थापक अनिरुद्ध काळबांडे यानी केले.
कार्यक्रमाची अध्यक्षता डीन व इलेक्ट्रॉनिकस एंड कॉम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. पंकज आस्टनकर यानी केली. या वेळी प्रामुख्याने आईटी विभाग प्रमुख सरोज शंभरकर, एलेक्ट्रोमैटिक्स फोरमचे अध्यक्ष राजेश कारामोरे सहित विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेत उपस्थित होते.
अनिरुद्ध काळबांडे यांनी मानव उत्तक्रांतीच्या 4 हजार वर्षापूर्विच्या इतिहास सांगीतला व म्हणाले की मानवाने टप्या टप्या उत्तक्रांती केली. ते म्हणाले 15 ते 20 वर्षापूर्वि इंटरनेट महाग होते. परंतू आत्ता सहज उपलब्ध होत आहेत. डाटा सायंस व कृत्रिम बुद्धीमता मध्ये भरपूर रोजगारांच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी संवेदनशील होत एआयच्या वापर करावा. एआय हे गतीशील साफ्टवेअर आहे. ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी गृप तयार करून प्रथम वर्षापासून स्टार्ट अप चालू करावे जेणेकरून चार वर्षात आपला स्वताच्या व्यवसाय स्थापन करून रोजगार निर्माण करू शकतील. त्यामुळे भारतात रोजगार क्रांति होईल. ते म्हणाले की स्टार्ट अप करीता केंद्र सरकारच्या अर्थसहाय व मार्गदर्सन करणाऱ्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे आयोजन सचिव श्री व्ही. श्रीनिवास राव आणि प्राचार्य डा. अविनाश श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनात एलेक्ट्रोमैटिक्स फोरम ने केले. डॉ. पंकज आस्टनकर यांनी प्रस्तावना केली. संचालन राधिका धोटे व आभार रुपाली गायधने यांनी केले.