रामटेक – राजु कापसे
आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान द्वारा आकाशझेपचा आठवा वर्धापन दिन व स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला ऑगस्टला तुरक कॉम्प्लेक्स रामटेक येथे रक्तदान व देहदान, अवयवदान संकल्प नोंदणी शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात ५२ व्यक्तींनी ऐच्छिक रक्तदान करून स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्तांना कृतिशील अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ता महादेव सरभाऊ यांनी मरणोपरांत देहदान अवयवदान संकल्प नोंदणी केली. रक्तदात्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि आकाशझेपचे सेवाभावी कार्य या विषयावर मार्गदर्शन केले. पोलिस अधिकारी कार्तिक सोनटक्के यांनी बोलताना आकाशझेप तर्फे कार्यान्वित सेवाभावी कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आकाशझेपचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी सूत्रसंचालन केले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर येथील वैद्यकीय चमूने उत्तमरीत्या रक्त संकलन कार्य केले.
याप्रसंगी आकाशझेपचे कोषाध्यक्ष दिलीप पवार, संचालिका अर्चनाताई कडबे, संचालक वैभव तुरक, प्रा. सुनील वरठी, धर्मेश भागडकर, विजय हटवार, गोपी कोल्लेपरा, ऋषी किंमतकर, ॲड. महेन्द्र येरपुडे, ॲड. प्रफुल अंबादे, अमोल खडोतकर, दुतीयोधन कडबे,
सोपाक कडबे, राजेश किंमतकर, बिकेंन्द्र महाजन, डॉ. बापू सेलोकर प्रा. उन्मेष पोकळे, प्रदीप कडबे हे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी नगरसेवक सुमित कोठारी यांचे द्वारा उपस्थितांना आलुभात वितरण करण्यात आले.
सतिश सुरुसे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित गजभिये, नंदकिशोर कुंभरे, मनाम एकता मंचचे कृष्णा कावळे, सुनील खुर्गे, उमेश पापडकर, सचिन वलोकर आणि पदाधिकाऱ्यांचे बहुमोल योगदान लाभले.