लोकार्पन व उद्घाटन प्रसंगी सेवकांकडुन चंद्रपाल चौकसे यांचा सत्कार
रामटेक – भगवान बाबा जुमदेवजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक – तुमसर मार्गावरील भंडारबोडी येथील पावनभूमी भवनाला कम्पाउंड वॉल व गेट ची कमतरता होती. त्यासाठी येथील काही सेवकांनी गेल्या तब्बल २० वर्षापासुन या त्या नेत्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले मात्र त्यांना फोल ठरणाऱ्या आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नाही.
शेवटी हताश होऊन येथील परमात्मा एक च्या सेवकांनी पर्यटक मित्र तथा सरपंच सघटनेचे चंद्रपाल चौकसे यांचेपुढे आपली कैफीयत मांडली. चौकसेंनी एका झटक्यात होकार देत बांधकाम अल्पावधीत उरकवले. आज दि. १५ जुलै ला त्याचा उद्घाटन व लोकार्पन सोहळा होता. त्यात चंद्रपाल चौकसे यांनी सेवक सेविकांना ‘ मी गोरगरीबांची सेवा करत राहील ‘ असा आशिर्वाद मागीतला.
भंडारबोडी येथील परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपुर द्वारा संचालित पावनभुमीला कम्पाउंड वॉल व गेट ची नितांत गरज होती. तेव्हा यासाठी मदतीचा हात देणाऱ्या अनेक नेत्यांपुढे येथील सेवकांनी समस्या ठेवली. यात तब्बल २० वर्षाचा कालावधी लोटून गेला मात्र सेवकांच्या हाती फोल ठरणाऱ्या आश्वासनांशिवाय काहीही लागले नाही.
तेव्हा शेवटी हताश होऊन येथील श्री. गोपीचंदजी तूपट (काकाजी) मार्गदर्शक पावनभूमी भंडारबोडी, श्री. दिलीपजी कोलते (अध्यक्ष, पावनभूमी भंडारबोडी), श्री. सेवकरामजी दिवटे, श्री. हरिभाऊ तुपट व काही सेवक-सेविकांनी ही समस्या चंद्रपाल चौकसे यांच्यापुढे मांडली.
चौकसेंनी विनविलंब त्यांच्या विनंतीला मान देऊन परमात्त्मा एक आश्रम पावनभूमी भंडारबोडी येथे संरक्षण भिंत व गेट बनवून दिले. या संरक्षण भिंत व गेटचे लोकार्पण व भुमीपुजन आज दिनांक १५ जुलै रोज शनिवारला रामधामचे संस्थापक, पर्यटक मित्र श्री. चंद्रपालजी चौकसे यांचे शुभहस्ते पार पडले.
दरम्यान या शुभप्रसंगी श्री. गोपीचंदजी तूपट (काकाजी) मार्गदर्शक पावनभूमी भंडारबोडी, श्री. दिलीपजी कोलते (अध्यक्ष, पावनभूमी भंडारबोडी) व समस्त सेवक-सेविकां तर्फे चंद्रपाल चौकसे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर परमात्मा एक आश्रम पावनभूमी च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने श्री. राजेश जयस्वाल (समाजसेवक रामटेक), श्री. गोपीचंदजी तूपट (काकाजी) मार्गदर्शक पावनभूमी भंडारबोडी, श्री. दिलीपजी कोलते (अध्यक्ष, पावनभूमी भंडारबोडी), श्री. सेवकरामजी दिवटे, श्री. हरिभाऊ तुपट, श्री. गजाननजी मेश्राम, श्री. खेमराजजी तडस, श्री. प्रमोदजी डोणारकर,
श्री. बाळाजी दिवटे, श्री. शिवशंकर ढोंगे, श्री. योगेश म्हात्रे, श्री. राजेंद्रजी तुपट, श्री. कारेमोरेजी, श्री. भगवानजी पचारे, श्री. अमर तरारे, श्री. कैलास दिवटे, श्री. विजु तुपट, श्री. शैलेश जयस्वाल, श्री. राजुजी कापसे, श्री. जगदीशजी सांगोडे, श्री. पंकज बावनकर, श्री. महेंद्र दिवटे, श्री.रुपेश वनवे व सेवक-सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.