Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा) येथे ७७ व्या स्वातंत्र दिना निमित्य राष्ट्रध्वजाला...

रामटेक | ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा) येथे ७७ व्या स्वातंत्र दिना निमित्य राष्ट्रध्वजाला मानवंदना…

रामटेक – राजु कापसे

रामटेक ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा) येथे 77 व्या स्वातंत्र दिना निमित्य राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याकरीता , उपस्थित सर्व नागरीकांचे समक्ष राष्ट्रपिता माहात्मा गांधी तसेच भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांचे प्रतिमेचे पुजन करून मा.सरपंच श्री.मदन खुशालराव सावरकर, यांचे शुभ हस्ते ठिक 8:15 मिनिटांनी ग्रामपंचायत शितलवाडी परसोडा येथे राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देवुन मा. उप सरपंच श्री. विनोंद चंद्रभानजी सावरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच मा.सरपंच यांचेे शब्दस्वरूपात मोलाचे मार्गदर्शन मिळाले, कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्या सौ. अर्चनाताई संजयजी राउत, सौ. प्रार्थनाताई अनिलजी ठाकरे, सौ.सुरेखाताई छत्रपती हिवसे, सौ.वंदनाताई संजयजी येणुरकर सौ. प्राजक्ताताई अनिल हुमणे,

सौ. गीताताई रामुजी यादव सौ.प्रभाताई भाउरावजी देवढगले. श्रीमती निर्मलाताई झनकलालजी कोडवते,तसेच श्री. अजय शामराव चौधरी, श्री. प्रविण नरहरी बालमवार, श्री. नितिन नत्थुजी कापसे, श्री.आशिषकुमार पुरूषोत्तम भोगे, श्री भरत मोरेश्वर वाघमारे,श्री. कवडु राजाराम कोकोडे,

या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, श्री. टि.ए. गिरमकर यांनी केले. तसेच सर्वाना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिले. कार्यक्रमाला हातभार लाविणा-या कर्मचारी श्री. रामकृष्ण वंजारी,(पाणी पुवरठा कर्मचारी) श्री.धनराज पालिवार (लिपिक),श्री.अविनाश (चन्ने,कर्मचारी) श्री. जितेंद्र बेले,(वसुली कारकुन) श्री. प्रफुल डोंगरे, (पाणी पुरवठा) श्री.पुरूषोत्तम मोहनकर,(कर्मचारी) तसेच स्वच्छता दुत यांचे आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: