रामटेक -: (तालुका प्रतिनिधी)
रामटेक तालुक्याच्या शितलवाडी येथील रहीवाशी असलेल्या आर्या संदीप जंजाळ व आस्था संदीप जंजाळ या जुळ्या बहीनींनी सी.बी.एस.ई. पॅटर्न मध्ये तब्बल ९४ % गुण प्राप्त करीत यश संपादन केले. त्यांचे सर्वीकडे कौतुक केल्या जात आहे. शितलवाडी च्या आनंद नगर येथील रहीवाशी असलेल्या आस्था संदीप जंजाळ व आर्या संदीप जंजाळ या जुळ्या बहीनी मौदा येथील रिलायन्स फाउंडेशन स्कुल येथे सी.बी.एस.ई. पॅटर्न मध्ये इयत्ता १० व्या वर्गात शिक्षण घेत होत्या.
दरम्यान परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला असुन त्यामध्ये आर्या ने ५०० पैकी ४७४ गुण संपादन करीत ९४.८ % गुण प्राप्त केले तर आस्था ने ५०० पैकी ४७० गुण घेत ९४ % गुण प्राप्त केले. दोन्ही बहीनींनी आपल्या यशाचे श्रेय आपले शिक्षक व आई वडील यांना दिलेले आहे.
शिकवणी वर्ग न लावताही मारली बाजी
यात उल्लेखनिय बाब अशी की सी.बी.एस.सी. पॅटर्न मध्ये शिकत असतांनाही दोन्ही जुळ्या बहीनींनी शिकवणी वर्ग न लावताच एवढे मोठे यश संपादन केले असल्याची माहीती आस्था व आर्या ची आई सौ. जंजाळ यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की ९ एप्रील २०२३ ला झालेल्या नॅशनल डिफेन्स एकॅडेमी ( एन.डी.ए. ) च्या लेखी परीक्षेत आर्या व आस्था ने घवघवीत यश संपादन केले होते. परीणामस्वरूप त्यांची निवड ‘ स्पाय गर्ल्स सेंटर नाशिक ‘ येथे झालेली होती.