आंधळगाव, कांद्री, महा दुला येथे रेल्वेस्थानक प्रस्तावित : मार्ग असेल ४६.५० किमीचा…
रामटेक – राजु कापसे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अखेरीस नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील प्रस्तावित तुमसर- रामटेक रेल्वेमार्गाच्या मंजुरीची प्रतीक्षा नागरिक करत आहेत. प्रस्तावित नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची लांबी ४६.५० किमी असणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ५ एप्रिल २०१६ रोजी अधिकृतपणे रेल्वे बोर्डाकडे अहवाल पाठवून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कॉनिसन्स इंजिनिअरिंग कम ट्रैफिक (आर.ई.सी.टी.) सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च रुपये ५४८.०१ कोटी असून परताव्याचा दर (आर.ओ.आर.) ७.६ टक्के इतका असल्याच्या तत्कालीन पत्रात नमूद करण्यात आले होते. या प्रकल्पाची नोंद मध्य रेल्वेच्या ब्ल्यू बुकमध्ये करण्यात आली आहे..
हा प्रकल्प सुरुवातीला मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आला होता. परंतु, त्यात झोन वाटप सुधारणा करण्यात आल्यानंतर ८ एप्रिल २०१५ च्या रेल्वे बोर्डाच्या अधिकृतपणे मंजुरी पत्राद्वारे तो दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आला. तुमसर- रामटेक रेल्वे मार्गावर तुमसर तालुक्याच्या आंधळगाव, कांद्री आणि नागपूर जिल्ह्यातील महादुला येथे नवीन रेल्वेस्थानके प्रस्तावित आहेत. तर, रामटेक आणि तुमसर येथील विद्यमान रेल्वेस्थानकांचा विकास करणे अपेक्षित आहे.
रेल्वे मार्गाचा प्रस्तावित खर्च माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार
या रेल्वे मार्गासाठी एकूण प्रस्तावित ५४८.०१ कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेपैकी स्थापत्य अभियांत्रिकी कामांसाठी ४३२.२७ कोटी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी ६३.३६ कोटी आणि इतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक कामांसाठी ५२.३८ कोटी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी रेल्वे बोर्डाला दिलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
या रेल्वे मार्गासाठी स्थानिक नेत्यांनी प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा. हा रेल्वे मार्ग तयार करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्याही पुढाकाराची गरज आहे. हा रेल्वे मार्ग तयार झाल्यास ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. व्यापार व दळणवळणाच्या सुविधेत मोठी भर पडेल.
माजी आमदार.
मी आमदार असतानी खूप प्रयत्न केले तेव्हा हे सर्व्हे झाले.. पण खासदार यांनी काहीही केले नाही…पुढे रामटेक वरून पारसीवनि सावनेर असा मार्ग झाला तर आणखी सोईचे होइल… माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी…
दहा वर्षे पासून खासदार तुमाने हे सरकार मध्ये आहेत .. १०वर्षापासून निष्क्रिय आहेत. आता लोकसभेचे इलेक्शन असल्यामुळे फकत मंडई कार्यक्रमात दिसून राहिले..यांनी या कडे लक्ष देण्याची गरज आहे…दूधराम सव्वालाखे जिल्हा परीषद सदस्य नगरधन भांडारबोडी सर्कल…..
या मार्गासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत..मी आणि माजी आमदार रेड्डी साहेब सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि पुढे ही काम सुरू राहील..या भागतील बेरोजगारांना रोजगार उपलबध होइल…राहुल किरपांन.. तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी…