Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | अवैध रेती तस्कराच्या मुसक्या आवळत्या रेती चोरी प्रकरणात ट्रक घेतला...

रामटेक | अवैध रेती तस्कराच्या मुसक्या आवळत्या रेती चोरी प्रकरणात ट्रक घेतला ताब्यात…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – नदीपात्रातुन रेतीची अवैध तस्करी करणार्‍या विरुद्ध रामटेक पोलीसांनी धडक कारवाई प्रारंभ केली असुन रामटेक शहरातुन अवैध रित्या रेती वाहुन नेत असलेल्या ट्रक ला जप्त करण्यात आले आहे. अनेक घाटावरुन जिल्हातील तसेच जिल्हाबाहेरील रेती टास्करांचा डोळा असतो.

जेसीबीच्या माध्यमातुन अवैध उत्खनन करुन ट्रक ट्रक्टरच्या माध्यमातुन ही वाहतुक केली जाते. कधी राँयल्टी न काढता तर कधी एक राँयल्टी वर तिन ट्रिप हे तस्कर मारतात. रामटेक ठाणेदार ह्रदयनारायन यादव रात्री चा सुमारास गस्त घालीत असतांना रेती गाडी ओवर लोड केल्याचे आढळून आले.

शहानिशा केली असता ही अवैध वाहतुक असल्याचे आढळून आले व ट्रक त्यांचे वाहक यांना ताब्यात घेतले. पुढिल कारवाई रामटेक पोलीस करीत आहे. जप्त करण्यात आलेला ट्रक चालक आरोपी नामे १) शारीक शेख रा. अमरावती २) मालक नामे शेख शकील शेख छोटु रा. अमरावती असे आहे.

जप्त करण्यात आलेल्या ट्रक व वाळुची एकुण किंमत अवैधरित्या , विनापरवाना अंदाजे १२ ब्राँस रेती रु. ३६०००/- वाहतुक करतांना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातुन ट्रक क्र. एम एच २७ बीएक्स ९२९० किंमत रु. २००००००/- असे एकुण रु. २०३६०००/- माल जप्त करुन त्यांच्या विरुद्ध अप क्र. ८३८/२०२३ भादंवि कलम ३७९,

१०९ सह कलम ४८ (८) महसुल अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करुन सदर कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आशित कांबळे , सा. पोलीस निरीक्षक ह्रदयनारायन यादव यांचे मार्गदर्शनात DB पथक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार , पोलीस हवालदार अमोल इंगोले ,पोलीस शिपाई मंगेश सोनटक्के, शरद गिते , प्रफुल रंधई यांनी केली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: