Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | तीन मोटारसायकल चोरांना अटक...

रामटेक | तीन मोटारसायकल चोरांना अटक…

रामटेक – राजू कापसे

रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामटेक शहरात 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता सौरभ शंकर दिवटे रा अडेगाव तहसील मौदा हे आपल्या कुटुंबासह रामटेक येथे आनंद मेला पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांची मोटारसायकल स्प्लेंडर क्र. एमएच 40 एपी 4975 चोरीला गेली.

रामटेक पोलिसांनी 26 ऑगस्ट रोजी खबऱ्यांद्वारे कारवाई करून आरोपी रोशन शंकर वाघाडे वय 19 वर्षे, रा. खंडाळा, निखिल बाळकृष्ण चन्ने वय २१, प्रज्वल पचरू वैद्य वय १८ वर्षे, दोघे रा. कचूरवाही यांना अटक केली

आरोपींकडून चोरीला गेलेली, 20 हजार रुपये किमतीची मोटारसायकल व आरोपीची बजाज मोटारसायकल क्रमांक MH 40/T 1021 किमतीचा 30 हजार रुपये, एकूण 50 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई नागपूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक नागपूर रमेश धुमाळ,

रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रशांत काळे, पोउपनि श्रीकांत लांजेवार, पोउपनि हरिचंद्र मोरे, पोहवा अमोल इंगोले, पोहवा. गजानन माहुरे, पोना प्रफुल रंधई, पोशि मंगेश सोनटक्के, पोशि शरद गिते, पोशि धिरज खंते, पोशि योगेश कुयटे, चापोशी विशाल चव्हाण ने केली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: