रामटेक – राजु कापसे
राज्य शासन,ग्रामविकास विभाग, जि.प.नागपूर तसेच ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभिमान अंतर्गत संकल्पनाधारीत क्षमता बांधणी प्रशिक्षण मनसर ग्रामपंचायत परिसरातील सभामंडपात पार पडले.
या प्रशिक्षणाची सुरुवात दि.१ फेब्रुवारी ला होऊन ३ फेब्रुवारी ला समापन करण्यात आले.यावेळी या प्रशिक्षणाला परिसरातील ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,रोजगार सेवक,पाणीपुरवठा कर्मचारी, बचत गटाचे सी.आर.पी,बचत गटाचे अध्यक्ष या सर्वांनी आपापली उपस्थिती दर्शवली होती.
ग्रामस्थरावर ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास,गरिबीमुक्त गाव,ग्रामपंचायतीची भूमिका,आरोग्यदायी गाव,बालस्नेही गाव,जलसमृद्ध गाव,स्वच्छ व हरित गाव,महिलास्नेही गाव यासारख्या अनेक संकल्पनेवर भर देऊन या संबंधी प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षण केंद्रात प्रामुख्याने श्रीमती.
सोनाली सोनारे मॅडम व श्री.अनिल बिंझाडे सर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले.तर प्राप्त केलेल्या प्रशिक्षणाचे फायदे ग्रामपंचायतीचा विकास करण्यात मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रशिक्षण घेणाऱ्यांनी यावेळी प्रतिनिधीला दिली.