Thursday, September 19, 2024
Homeकृषीरामटेक | शहरातील शेतकरांने गावातील शेतकर्‍याचे पाण्याचे स्त्रोत बुजविले...

रामटेक | शहरातील शेतकरांने गावातील शेतकर्‍याचे पाण्याचे स्त्रोत बुजविले…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- देवलापार या आदिवासी क्षेत्रातील झिंजेरीया या गावात प्रितीश भोयर या व्यक्तीने सर्व्हे नंबर २४ ची शेती विकत घेतली, शेतीची मोजणी केली ज्या मध्य शेतीला लागुन असलेला बंदारा व नाला त्याच्या हदी मध्य येत आहे म्हणून शासनाने शेतकर्यानसाठी बांथुन दिलेला बंदारा तोडला व जलयुक्त शिवार अंतर्गत २०१६ मध्य खोलिकरण करण्यात आलेला नाला बुजविण्यात आला, या शेतकर्याने कृषी विभाग, ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयाला कोणत्याच प्रकारची माहिती दिली नाही,

बंदारा तोडल्यामुळे व नाला बुजविल्यामुळे आजुबाजुच्या शेतकर्याना पाण्यापासुन वंचित केले आहे, झिंजेरीया गावातील शेतकर्यानी तालुका कृषी विभाग रामटेक व अप्पर तहसील कार्यालय देवलापारला तक्रार दिली असुन बंदारा व नाला पुर्ववत करुन देण्यात यावे अशी मागणी केली आहे. दि.३ जुलै ला कृषि विभागाचे मंडळ अधिकारी व  झिंजेरीयाचे पटवारी यांनी घटनास्थळी येउन  संयुक्त मौका चौकशी केली व शेतकर्यान समक्ष पंचनामा केला.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: