रामटेक – राजु कापसे
रामटेक – पारशिवनी-नवेगाव खैरी, दि.१३/१२/२०२३ ला शिक्षण विभाग पंचायत समिती पारशिवनी द्वारा ‘समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरी येथे संपन्न झाले.
याप्रसंगी समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती मंगला निंबोने होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती करुणा भोवते, पंचायत समिती सदस्या तुलसी दियेवार, राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य सोनिराम धोटे, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे, केंद्रप्रमुख दिगांबर धवराळ, उर्मिला गायकवाड, प्रतिभा बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय आदर्शच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्या स्वागतार्थ काढलेल्या विज्ञान रांगोळी व सादर केलेल्या विविध कला आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या. कार्यक्रमाचे संचालन नीलकंठ पचारे, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांनी केले.
प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी साक्षोधन कडबे, दिलीप पवार, प्रशांत पोकळे, सतीश जुननकर, शैलेंद्र देशमुख, अमित मेश्राम, प्रा. मोहना वाघ, प्रा. सुनील वरठी, प्रा. अरविंद दुनेदार परिश्रम घेत आहेत.