रामटेक – राजू कापसे
सुनील केदार यांचे कट्टर समर्थक अनिल ऊर्फ मिन्नू गुप्ता यांची रामटेक तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष व लेखीराम हटवार यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
या निवडीमुळे या संस्थेवरील प्रशासक राज समाप्त झाले आहे.या संस्थेची मागील महिन्यात संचालक मंडळाची निवडणूक संपन्न झाली होती.
त्यावेळी सर्वश्री अनिल गुप्ता,सदाशिव पिल्लारे,सुनील मुलमुले,आश्चिन ठाकूर,दुष्यंत बावनकुळे,किशोर निचंते सुनिल डोकरीमारे,लेखीराम हटवार,रामचंद्र अडमाची,नरेंद्र डहरवाल, रश्मी कळमकर सुलोचना बागडे,निर्मला कामडी हे १३ संचालक अविरोध निवडून आले होते.या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि.१५ जुलै २०२४ रोजी निवडणूक सभा घेण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी रामटेकचे सहायक निबंधक व अध्यासी अधिकारी सुखदेव कोल्हे होते.
दुपारी २ वाजता निवडणूक सभेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी अनिल गुप्ता व रामचंद्र अडमाची यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी लेखीराम हटवार व सुनील डोकरीमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.मात्र नंतर अडमाची व डोकरीमारे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.त्यामुळे अध्यासी अधिकारी सुखदेव कोल्हे यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदी अनिल गुप्ता व उपाध्यक्षपदी लेखीराम हटवार निवडून आल्याचे जाहीर केले.यावेळी त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकाना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात. निवडणूक सभेला सर्व १३ संचालक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत संस्थेचे प्रशासक भरडभुंजे व व्यवस्थापक प्रशांत बोरकर यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल गुप्ता हे सहकार महर्षी सुनील केदार यांच्या अत्यंत विश्वासातील मानले जातात. त्यांनी यापुर्वी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकचे संचालक ही पदे भूषवली आहेत.२०१६ ते २०२३ पर्यंत ते रामटेक तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष होते.
या कार्यकाळात त्यांनी या संस्थेला कर्जमुक्त तर केलेच, राज्यात शासकीय धान खरेदीत शासनाची अभिकर्ता संस्था म्हणून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता हे विशेष उल्लेखनीय.आगामी कार्यकाळात सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने संस्थेला अजून वैभवशाली करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आपले नेते सुनिल केदार यांनी पुन्हा ही संधी पुन्हा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
विजयी मिरवणूक…..
निवडणूक संपन्न झाल्यानंतर अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व संचालक आणि समर्थक यांच्या सह विजयी मिरवणूक काढण्यात आली.संस्थेच्या कार्यालयातून ही मिरवणूक गांधी चौक येथे गेली,तिथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान, संचालक त्रिलोक मेहर,विरेश आष्टनकर,नकुल बरबटे,विजय मदनकर,रामू झाडे,भिमराव आंबिलडूके,योगेश मात्रे, निळकंठ महाजन यांचेसह मनोज नौकरकर, हंसराज वाघमारे,निखिल पाटील,नितीन भैसारे,अरविंद कडबे,राहुल कारामोरे,अमन गुप्ता,मोईम पठाण यांच्यासह असंख्य चाहते व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले.