Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | चारित्र्यावर संशय घेत पत्नीला केले जिवानिशी ठार...

रामटेक | चारित्र्यावर संशय घेत पत्नीला केले जिवानिशी ठार…

रामटेक तालुक्यातील तुमसर मार्गावरील बोरी जंगल परिसरातील घटना

आरोपीच्या आवळल्या मुसक्या

रामटेक – राजु कापसे

चारीत्र्यावर संशय घेत पत्नीला गावापासुन विस पंचेविस किलोमिटर दुर असलेल्या एका जंगल परीसरात नेवुन जिवानिशी ठार मारल्याची घटना नुकतीच २४ ऑक्टोंबर ला उघडकिस आली.

रामटेक पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि. १५ ऑगस्ट रोजी फिर्यादी सौ. संगीती रुपलाल कारामोरे यांची मोठी मुलगी नामे दिव्या हि घरुन कोणाला काही न सांगता निघुन गेली व बोरी सिंगोरी येथे राहणारा छोटु यादव यांच्या सोबत लग्न करुन त्याच्या सोबत त्याच्या घरी राहत होती. त्या दरम्याण दोन महिणे फिर्यादी व तिच्या मुलीसोबत भेट झाली नाही.

दि. १९ ऑक्टोंबर रोजी फिर्यादी हिला कन्हान पोलीस स्टेशन येथुन फोन आला व फिर्यादीला त्यांचा मुलीबाबत विचारपुस केली तेव्हा फिर्यादीला माहीत पडले की, त्यांची मुलगी तिच्या नवऱ्यासोबत दवाखाण्यात गेली असता त्यांच्यात भांडण झाल्याने ति रागात दवाखान्यातुन निघुन गेली आहे.

फिर्यादी हिने तिचे मोठी मुलगी तिच्या घरी आली नाही असे सांगीतले. फिर्यादीने हा सर्व प्रकार तिचा भाऊ दिलीप नैताम याला सांगीतल्याने फिर्यादी चा भाऊ रोज छोटु यादव याला फोन करुन दिव्या बाबत विचारपु करत होता.

दि. २४ ऑक्टोंबर रोजी फिर्यादीला पोलीस स्टेशन रामटेक येथे बोलावुन रामटेक हदिदीत मिळालेल्या अनोळखी महिलेचे फोटो व दागीने दाखविल्यावरुन फिर्यादी हिने ते प्रेत तिच्या मुलीचे सांगुन तिच्या मुलीला तिच्या मुलीचा पती छोटु यादव याने रामटेक येथे आणुन ठार मारल्याचे सांगत असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन सदर चा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला व त्या दिशेने पोलीसांनी तपास सुरु केला.

सदर गुन्हाच्या तपास कामी मृतक दिव्या चा पती छोटेलाल समेलाल यादव वय २० वर्ष रा. बोरी सिंगोरी ता. पारशिवणी याला पोलीस स्टेशन येथे आणुन विचारपुस केली असता त्यांने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन झगडा भांडण होत असल्याने आपल्या पत्नी चा बोरी जंगल शिवार येथे खुन केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यास अटक केली असुन सदर गुन्हाचा पुढील तपास सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक आशित कांमळे हे करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: