राजु कापसे
रामटेक
रामटेक येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा तर्फे रामटेक परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सोयींनी उपयुक्त व करोडो रुपयांचा शासकीय निधी खर्च करुन “पर्यटक माहिती केंद्र बांधण्यात आले. परंतू आजपावेतो सदर पर्यटक माहिती केंद्र हे दुर्लक्षित असून पर्यटकांच्या उपयोगी पडले नाही.यासाठी वंचित बहुजन आघाडी रामटेक तर्फे उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देण्यात आले.
तसेच आजतारखेस सदर ठिकाणी निर्माण केलेली वास्तू, फर्निचर, विद्युत व्यवस्था, पाणी, कचरा व्यवस्थापन, उद्यान, उद्यानातील पाण्याअभावी झाडे यासर्व बाबी उपलब्ध असुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे निकामी अवस्स्थेत आहेत.याउलट रामटेक शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर दूर, खागजी पैशाने बांधलेले स्थानिक पुढाऱ्याचे उद्यान हे नेहमी हिरवेगार, लहान मुलांसठी सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध, तसेच पर्यटकांसाठी १२ ही महिने सुख-सुविधांनी उपलब्ध असते. याचाच अर्थ असा की, सर्वसामान्यांनी दिलेल्या कराच्या निधीतुन शासनामार्फत जनतेसाठी विकासाच्या नावावर पर्यटन योजना राबवून त्याची खंडक अवस्था होत आहे. स्थाकडे मुद्दाम दुर्लक्ष करायचे जेणेकरुन पर्यटनाचा धंद्याचा फायदा हा खाजगी पर्यटन व्यापाऱ्यांना व्हावा आणि तरीसुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे इतक्या वर्षांपासून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.
करीता अंबाळा रोड, रामटेक येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तर्फे बांधण्यात आलेले “पर्यटक माहिती केंद्र” तात्काळ पर्यटकांसाठी सुरु करण्याकरीता आपले विभागामार्फत त्वरीत कार्यवाही करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.