रामटेक – राजु कापसे
मध्यप्रदेश इनक्रेडिबल इंडिया, हॉटेल अँड रिसॉर्ट ग्रुप, ब्रुक्स आणि जल ग्रुप यांच्या संयुक्त तत्वावधानाने पचमढी मान्सून मॅरेथॉन २०२४ चे आयोजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी केले गेले होते. ही स्पर्धा ५, १०, २१, ४२ की.मी. आणि महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या वयोगटात आयोजित केली गेली होती. रामटेक सृष्टी सौंदर्य चे एकूण २८ खेळाडूंनी यात भाग घेत ५ की.मी. ३१ ते ४५ वयोगटातून एकता खंते आणि ४६ ते ६१ वयोगटातून डॉ. मंजुषा सेलोकर यांनी प्रथम स्थान प्राप्त करून रामटेक चे नाव प्रसिद्धीस आणले.
दक्ष खंते यांनी ४२ की.मी. स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वी रित्या पूर्ण केली. फुल मॅरेथॉन साठी मध्य रात्री सुरू झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांना अंधाराचा आणि प्रचंड संततधार पावसाचा आणि विपरीत हवामानाचा त्रास सहन करीत उच्च मनोबल कायम राखीत स्पर्धा पूर्णत्वास नेली. बाकी सर्वच ५ की.मी. स्पर्धेत ८, १० की.मी. स्पर्धेत १२ आणि २१ की.मी. स्पर्धेत ६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आणि उत्साहाने स्पर्धा पूर्ण केली.
आयोजकांद्वरे इतक्या जास्त प्रमाणात एकाच ग्रुप चे स्पर्धक सहभागी झाले म्हणून रामटेक सृष्टी सौंदर्य परिवाराचा सन्मान करण्यात आला. रामटेक परिसरातील शुभचिंतक आणि मित्रांकडून अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात असतांना रामटेक सृष्टी सौंदर्यच्या सहभागी सर्व खेळाडूंनी अश्या स्पर्धेत सर्व वयोगटातील स्त्री – पुरुषांनी भाग घेत आपले शरीर आणि आयुष्य सुंदर आणि उल्हासित बनविण्याचे आवाहन केले आहे.