रामटेक – राजू कापसे
श्रीराम शिक्षण संस्था द्वारा संचालित ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर यशस्वीरित्या पार पडले. नवरगाव येथील नागार्जुन परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन नवरगावच्या माजी सरपंच मंजुषा गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनिल दाणी , रासेओ कार्यक्रम अधिकारी, विद्यासागर महाविद्यालय, खैरी विजयवाडा, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू हे होते. तसेच डॉ.वंदना खटी, कुमारी प्राची धावडे , व इतर ग्रामस्थ व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.चंद्रमोहन सिंग बिष्ट यांनी केले, उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन श्री.अनुराग गजभिये व अभार योगेश वाडीवे यांनी केले. शिबिरादरम्यान तीन वेगवेगळ्या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
ज्यामध्ये श्री नरेश आंबिलकर, डॉ राहुल हंगरगे आणि डॉ संतोष जेगठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रासेओच्या शिबिरार्थ्यांनी गावात सर्वेक्षणासोबतच ग्रामस्वच्छता, मतदान, स्त्री-पुरुष समानता या विषयांवर पथनाट्याद्वारे जनजागृती केली. शिबिरादरम्यान रासेओच्या शिबिरार्थींनी नागार्जुन टेकडी येथे प्लॅस्टिकमुक्त मोहीमही राबवली ज्यामध्ये प्लास्टिकने भरलेल्या 54 बाटल्या बाहेर काढण्यात आल्या.
शिबिराच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.राजेश सिंगरू, नवरगाव ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.ज्योती ठाकरे, डॉ.हंगारगे, डॉ.सुशील लोणकर, श्री.अक्षय पंडे , श्री.विनोद मुदलियार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता कुंभलकर आणि आभार जागृती पंचभाई हिने केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. प्राची धावडे, श्री.देवेंद्र अवथरे, श्री.अमोल यंगड, श्री.रुपेश राऊत, सौ.लता भोंडे यांनी परिश्रम घेतले.