राजु कापसे
रामटेक
रामटेक:- श्रीराम शिक्षण संस्था रामटेक अंतर्गत ताई गोळवलकर महाविद्यालयात कार्यरत असलेले सोनु बेठेकर यांनी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत विविध खेळ प्रकारामध्ये उज्वल कामगिरी करत दोन सुवर्ण व दोन रजत पदक प्राप्त केली. २६ ते ३१ आँक्टोबर २०२३ दरम्यान दुबई पोलीस क्लब , अल झळरावी या ठिकाणी पहिली ओपन इंटरनँशनल मास्टर्स चँम्पियन्सशीप स्पर्धा पार पडली. 5 k.m. walk Race Run मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
४०० मिटर मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केली. दोन रजत पदक अनुक्रमे १५०० मिटर आणि गोळा फेक मध्ये रिले ला सुद्धा सहभागी होउन चौथा क्रमांक पटकावला . एकुण चार पदक प्राप्त केली. सोनु बेठेकर यांना श्रीराम शिक्षण संस्थेची अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी तसेचस सचिव डाँ. प्रशांत पंडे प्राचार्य डाँ सिंगरु सर तसेच शिक्षक वृंद , शिक्षेकतर कर्मचार्यानी महाविद्यालयातर्फे सत्कार करुन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.