रामटेक – राजु कापसे
सक्षम संस्था, रामटेक,मातृका फांउडेशन रामटेक,सृष्टी सौंदर्य संस्था, रामटेक च्या वतीने स्नेहसदन बौद्धिक अक्षम (मतीमंद) मुलांची विशेष शाळा शितलवाडी ता.रामटेक येथे आज मा.उमाकांतजी भुजाडे, मुख्य खान प्रबंधक, मनसर माईन यांच्या हस्ते पूजन व गुढी उभारणी करण्यात आली.
त्यांनतर दिव्यांग मुलांकरिता अविरत सुरू असलेले स्नेहसदन च्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले. सक्षम संघटनेचे देशपातळीवरील काम व सक्षम चे मुख्य उद्देश माहिती तसेच सक्षम दिव्यांग समर्थ भारत ची कल्पना सर्वांमिळून साध्य करण्याची भावना विदर्भ प्रांतमंत्री मा.आशुतोषजी देशपांडे सरांनी व्यक्त केली.
मा.डॉ.अंशुजा किम्मंतकर मैडम अध्यक्ष, मातृका फांउडेशन व सक्षम रामटेक च्या वतीने महिला व दिव्यांगाकरिता कशाप्रकारे सहाय्यक ठरत आहे व भविष्यात काय करणे अपेक्षित आहे यांचे मार्गदर्शन केले.
डॉ.ललीता चंद्रात्रे मैडम यांनी दिव्यांग मुलांत असलेल्या विविध कलागुणाला एक व्यासपीठ आपण मिळवणे व त्याकरिता कवि कुलगुरू कालीदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक शाळेला मदत करेल व नियमित एक वर्ग योगा दिव्यांग मुलांना करवुन घेण्याबाब प्रशिक्षक पाठविण्याचे आश्वासन दिले.
श्री.ऋुषीकेशजी किम्मंतकर सरांनी दिव्यांग मुलांना स्विमींग व इतर खेळात केलेल्या कामगिरी क्व क्षमतेचे उदाहरण देऊन क्रिडी क्षेत्र बाबत माहिती दिली. मा.श्री.उमाकांतजी भुजाडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिव्यांग सक्षम व त्याकरिता केलेले निरंतर प्रयासाने नक्कीच यश संपादन होते असे अनुभव व्यक्त केले.
भविष्यात शाळेला मॉयल मार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी हमी दिली. श्री पंकज पांडे यांनी शाळा चालविण्याचे मुख्य उद्देश दिव्यांगांच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल आपली असलेली निरागस भुमिका स्पष्ट केली. उपस्थित दिव्यांग मुलांना मान्यवरांच्या हस्ते टि शर्ट चे वाटप या.माह्त्रे मैडम यांच्या सहयोगाने करण्यात आले.
यावेळी मातृका फोंडेशन च्या अनेक महिला सक्षम रामटेक चे प्रतिनीधी श्री.वैरागडे,श्री.वानखेडे सह स्नेहसदन शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंकज पांडे श्रीमती सविता अतकर,प्रिया दुबे, श्री प्रवीण महल्ले श्री प्रीतम मानकर श्री प्रदीप बागडे कुमारी किश्वर शेख,अशोक पातोडे,सविता ढबाले,सचिन झाडे, मोनिका सांगोडे, विशाल भाजीपाले अमन दीक्षित नितीन खेवले अतुल घोडाकाडे मिनाक्षी वाघधरे, अश्विनी वानखेडे,सुनिता मसराम सह माेठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थीत होते. शाळेच्या वतीने श्री पंकज पांडे यांनी उपस्थीत मान्यवरांचे आभार मानले अल्पोआहार देऊन कार्यक्रम संपन्न झाला..मिळालेल्या स्नेहांने दिव्यांग मुले हर्षोउत्साहित झाले.