रामटेक – राजु कापसे
रामटेक नगर पालिकेने शहरात ११/०३/२०२४ ला व त्या अगोदर गांधी चौक रामटेक ला अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. या कारवाईला काही दिवस होत नाही तोच प्रमुख रस्ताच्या बाजुला फुटपाथ वर हातगाड्या, टपर्यांचे दुकान, बाबुची चटई असलेले शेड , ग्रीन नेट लावलेली दुकान यांचे अतिक्रमण वाढत आहे.
रामटेक – आंबेडकर चौक- गांधी चौक – संताजी चौक – तुमसर रोड तसेच बस स्टँड -तुमसर रोड बाय पास शिवाजी पार्क रामटेक भोवताल रोड वर तर फुटपाथ देखील अतिक्रमणधारकांनी व्यापले आहेत. अतिक्रमणाचा हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी रामटेक मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हाँकर्स झोन उधारणी गरजेची आहे.
तसे प्रयत्न होत नाहीत. अतिक्रमन व रामटेक शहर हे समिकरण आता नविन राहिले नाही. मागील काही वर्षात रामटेक शहरात तीन- चार वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. पंरतु अतिक्रमण मोहिमेत काही महीणे होत नाही तोच पुन्हा फुटपाथ, रस्तावर अतिक्रमण केले जाते. रामटेक मधील गांधी चौक ते राखी तलाव, भाजी मंडीतील किराणा दुकान , बस स्टँड समोरील शिवाजी पार्क या मार्गावल पुन्हा हातगाडी , टपर्या ,ठेले, ग्रीन नेट टाकुन दुकान अतिक्रमणाचे पेव फुटले आहे. काही दिवसापूर्वी जी अतिक्रमित दुकाने हटवली तेथे पुन्हा टपर्या, ठेले थाटल्या जातात.
रामटेक शहरात गांधी चौक – तुमसर रोड व गांधी चौक – मनसर रोडवर रिकाम्या टपर्या ठेवून जागा अडवल्या आहेत. फुलझाडे विक्रेते थेट रस्तापर्यत पोहचले आहेत. वारंवार शहरात होणारी गाड्याची कोंडी होत आहे. सर्व्हिस रोड सुद्धा गँरेज वाले आपले दुरुस्तीचे वाहन उभे करुन वाहनांची कोंडी करत आहे.
बलबलकारी नसल्यावर हाँकर्स झोन उभारणीसाठी प्रशासनांनी संकल्पना माडावी. राष्ट्रीय फेरीवाली धोरणानुसार हाँकर्स झोनची उभारणी केली पाहीजे. त्यामुळे गरीब फुटपाथ ठेलेवाले, टपरी, अश्या लोंकाना वारवार प्रशासना पासुन त्रास होणार नाही.