Saturday, November 23, 2024
Homeराज्यमा. राजेश किंमतकर यांची रामटेक शिवसेना शहरप्रमुख नियुक्ती...

मा. राजेश किंमतकर यांची रामटेक शिवसेना शहरप्रमुख नियुक्ती…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- गंगा भवन रामटेक येथे शिवसेना बूथ प्रमुख ,शिवदुत व पदाधिकारी यांचा मेळावा आमदार श्री आशीष जयस्वाल साहेब व श्री संदीप जी इटकेलवार जिल्हा प्रमुख शिवसेना, श्री वर्धराज जी पिल्लै उप जिल्हा प्रमुख श्री नरेश जी धोपटे विधानसभा संघटक ,श्री संजय झाडे जिल्हा परिषद सदस्य ,श्री चंद्रकांत कोडवते सभापती पं, स, श्री संजय नेवारे मा, सभापती श्री कमलेश शरणागत उपजिल्हा प्रमुख युवा सेना व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला,

या प्रसंगी रामटेक तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला तसेच रामटेक तालुका शिवसेना व युवा सेना ची कार्यकारिणी घोषित करुण पदाधिकारी ची नियुक्ति करण्यात आली. तसेच शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते माजी नगरसेवक पद व महत्त्वाच्या जवाबदार्‍या सांभाळलेले आणि पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रीय असणारे राजेश किंमतकर यांची रामटेक शिवसेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर प्रमुख पदावर नियुक्ती करुन शहर शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. रामटेक विधानसभेचे आमदार आशिषजी जयस्वाल यांच्या सुचनेनुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपजी ईटकेलवार यांचा आदेशानुसार राजेश किंमतकर यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान किंमतकर यांनी विविध जबाबदर्‍या सांभाळल्या आहेत. विविध निवडणुका आणि ग्रामीण भागातील पक्षाचा विस्तार याचा विचार करता शहरी चेहरा असलेले शहर प्रमुख शिंदे गटाला कितपत न्याय देऊ शकतील. अशी चर्चा सुरु झाली आहे.

शहरात शिवसेना घराघरात नेणार असुन मजबुत बांधणी करणार आहे, त्यासाठी विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेणार आहे. अशी प्रतिक्रिया किंमतकर यांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: