Sunday, December 8, 2024
Homeराज्यरामटेक शिवसेनेच्या वतीने आमदार आशिष जयस्वाल यांना मंत्रिपद देण्याची मागणी...

रामटेक शिवसेनेच्या वतीने आमदार आशिष जयस्वाल यांना मंत्रिपद देण्याची मागणी…

रामटेक – राजू कापसे

आमदार आशिष जयस्वाल हे महाराष्ट्रच्या विधानसभेमध्ये पाचव्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. चारदा ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर व एकदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. अपक्ष असताना देखील त्यांनी महायुतीला आणि शिवसेनाला आपले समर्थन दिलेले होते.

एक अत्यंत अभ्यासु असे व्यक्तिमत्त्व म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जातात. शासनाच्या युती सरकारच्या काळात शासनाचे क्रित्येक शासन निर्णय बनविणारे एक प्रभावी आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी केवळ आपल्या मतदासघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पांदण रस्त्याचे शिल्पकार, आपल्या मतदारसंघात लाडली बहीण शासकिय योजना प्रभावीपणे राबविण्यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

आजपर्यंत रामटेक विधानसभा क्षेत्राला ७५ वर्षाच्या कार्यकाळामध्ये केवळ मधुकर किंमतकर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ वगळता मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. पण त्यानंतर रामटेक विधानसभेला कधीही मंत्रीपद लाभलेले नाही. यावेळेस आशिष जयस्वालच्या रूपाने त्यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रामटेक, पारशिवानी, कन्हान, देवालापार येथील नागरिक आणि विधानसभा मतदासंघातील सर्व नागरीक करीत आहेत.

दुसरी गोष्ट अशी की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवलापार येथिल प्रचार सभेमध्ये ग्वाही दिली होती की, आशिष जयस्वाल यांना तुम्ही निवडूण दया, त्यांना मी मंत्री करतो. अशा प्रकारची घोषणा सुद्धा त्यांनी केली होती. त्यानुसार रामटेक शिवसेनेचे माजी नगर परिषद सभापती बिकेंद्र महाजन समवेत रामटेक मतदारसंघतील तमाम जनतेची अशी मागणी आहे की आमदार आशिष जयस्वाल यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात समाविष्ट करावे.

सरकारचे उलथा – पालट झाले त्यामुळे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झालेत ते घडविण्यात आमदार आशिष जयस्वाल यांचा मोठा वाटा आहे. आणि यामुळे आशिष जायस्वाल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी आशा रामटेकची जनता करीत आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: