रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 09.09.2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर, एस.एम.सरोदे यांचे अध्यक्षतेखाली दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, एच.एस. सातपुते, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,
व प्रथम श्रेणी न्याय. दंडाधिकारी, डी.एस.सैदाने यांचे सहकार्याने दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनल समोर दिवाणी व फौजदारी प्रकरणातील एकूण 148 प्रलंबित प्रकरणांचा आपसी तडजोड करून 46 लाख 16 हजार 812 रुपयाचा निपटारा करण्यात आला.
लोक अदालत मध्ये नेमलेल्या पॅनल क्रमांक 1 वर एड.रमण गजभिये, पॅनल क्रमांक 2 वर एड.स्वाती वहाने यांनी कामकाज बघितले. यावेळी भारतीय स्टेट बँक रामटेक चे शाखा व्यवस्थापक अभिषेक मिश्रा यांचे सह इतर बँकेचे मॅनेजर सह कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय लोकअदालतीत एड. रमन गजभिये, एड. स्वाती वहाने, एड. देवळे , एड. आनंद गजभिये , एड. महेंद्र येरपुडे, प्रीती महाजन, एड. ए.जी. कारेमोरे, एड.एम. ए. गुप्ता, एड. के. एम. नवरे,
एड. संतोष केला , एड. गायकवाड , एड. काशीकर एड.जयश्री मेंघरे यांचे सह तालुका वकील संघाचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी न्यायालयीन कर्मचारी अधीक्षक एन. पी. उरकुडे, स. अधिक्षक ए. पी. तेलंगे, लघु लेखक घोसेकर, प्रीती मेहेत्रे, वरिष्ठ लिपिक यु. एच. पवार ,दिनेश पाकडे,संदिप गिरडकर,
किरण खोब्रागडे कनिष्ठ लिपिक पी.एस. कामडी , हरीष खोब्रागडे, एम ए. खान, वाघमारे, सौ चैताली सहारे, सौ. वडुरकर, शिपाई मदन जत्रे, संदीप लहासे, श्रीमती ठाकूर कंत्राटी सफाई कर्मचारी अभिषेक उईके सह न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार उपस्थित होते.
वेळेची व पैशाची बचत होत असल्यामुळे मिळालेल्या शिकवणीतून वाद वाढविण्यात अर्थ नाही लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणांचा आपसी समझोत्याने निपटारा करावा हा न्यायालयाचा मोलाचा संदेश आत्मसात करून आपसी तडजोडीने न्यायाधीश व वकिलांच्या सहकार्याने पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला हे विशेष.