Tuesday, November 12, 2024
Homeराज्यरामटेक | स्व. डॉ. लोकचंद शरणांगत यांच्या पुण्यतिथी निमीत्त्याने, भव्य निःशुल्क रोगनिदान...

रामटेक | स्व. डॉ. लोकचंद शरणांगत यांच्या पुण्यतिथी निमीत्त्याने, भव्य निःशुल्क रोगनिदान शिबीरात ३०० हुन अधिक रुग्णानी घेतला लाभ…

रामटेक – राजू कापसे

रामटेक येथील डॉ शरणागत दवाखाना हिरण आॅप्टीकल, रामाळेश्वर मंदिर येथे दिनांक 08सप्टेंबर 2024 ला सकाळी १० ते २ वाजेपर्यंत तज्ञ डॉक्टरांकडून सुमारे 300 हुन अधिक रुग्णांचे मोफत रोगनिदान, चाचण्या, उपचार, मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

शिबीरामध्ये हृदयासंबंधी तपासणी, नेत्र रोग तपासणी, मोतियाबिंदू तपासणी, अस्थिरोग तपासणी, लहान मुलांच्या आजारांची संपूर्ण तपासणी,चर्मरोग तपासणी, दंतरोग तपसनी, स्त्री रोग तपासणी,एन्जियोप्लास्टी बायपासच्या पेशंटचे फॉलो अप, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, ई.सी.जी., HBA1C LIPID PROFILE तपासनी मोफत करण्यात आली तसेच एलोपैथिक, आयुर्वेदिक व होमिओपॅथीक पद्धतीने समुपदेशन करण्यात आले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी तज्ञ डॉक्टर श्री डॉ. खुशाल लोकचंद शरणांगत हृदयरोग तज्ञ MBBS MD DNB (Cardiology), डॉ. सुमेध रामटेके हृदयरोग तज्ञ MBBS MD DM (Cardiology), डॉ. हिती आशिष शरणांगत जनरल फिजीशियन तज्ञ BHMS, CGO, डॉ. कश्मीरा खुशाल शरणांगत स्त्रीरोग तज्ञ MBBS DGO,

डॉ. भास्कर पटले (दंत चिकित्सक) MDS, डॉ. निकेत ठोंबरे (अस्थिरोग तज्ञ) MBBS Orthopaedic Surgeon,डॉ. निलेश गद्देवार नेत्ररोग तज्ञ MBBS MS (Opthamology), डॉ. पुजा मनवर रामटेके चर्मरोग तज्ञ MBBS MD, डॉ. पंकज शरणांगत (आयुर्वेद सल्लागार) BAMS Ayurvedic,

डॉ. निकुंज शरणांगत जनरल सर्जन, प्रोक्टोलॉजिस्ट सल्लागार BAMS MS , गरजू लोकांना मोफत दवाई देनयात आली शिबीराचे आयोजन श्री आशीष शरणांगत, श्रीमती सुर्यकांता शरणांगत, भोजू कटरे, प्लेटिना हॉस्पिटल नागपुर , रामलेश्वर नवयुवक गणेश उत्सव मंडल, यांनी स्व. डॉ. लोकचंद शरणांगत यांच्या पुण्यतिथी निमीत्त्याने शिबीराचे आयोजन केले होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: