Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | धावत्या ट्रकला भिषण आग...

रामटेक | धावत्या ट्रकला भिषण आग…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – नागपूर- जबलपूर महामार्गावरील आमडी फाट्यावर कोळसा वाहतुकीच्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली. त्यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. ही घटना नागपूर जिल्हातील पारशिवनी पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या आमडी फाट्याजवळ महामार्गावर कोळशाने भरलेल्या ट्रकला आग लागली. यामुळे महामार्गावरील वाहतुक तिन तास ठप्प होती.
कन्हान गोंडेगाव उपक्षेत्रातून महाजनको खापरखेडा जाणार्‍या एम एच-४० सीडी-७९४८ क्रमांकाच्या ट्रक हा एकुण ३८ टन ७५० किलो कोळसा घेवून जात होता.

कोळसा भरलेल्या १६ चाकी ट्रकला आमडी फाट्याजवळ अचानक पेट घेतला. ट्रक चालकांचा लक्षात येताच त्यांनी ट्रकरस्ताच्या कडेला उभा करुन चालक ट्रक खाली उतरुन पाहणी केली असता कोळश्यात मोठ्या प्रमाणात आग पकडलेली होती. घटनेची माहीती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलीसांनी पारशिवनी नगरपंचायतच्पा अग्निशमक दलाला पाचारण केल्यानंतर तासाभरात आग विझविण्यात आली. यादरम्यान महामार्गावरील वाहतुक सुमारे तिन तास ठप्प होती. नागपूर जिल्हात सध्या उष्णलेची मोठी लाट पसरली आहे त्यामुळे या ट्रक ला आग लागली असावी. पुढिल तपास पोलीस अधिकारी पारशिवनी करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: