रामटेक – राजू कापसे
सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० सप्टेंबर रविवारी सकाळी ६.३० वाजता रामटेकमध्ये ५ किमी मॅरेथॉन वॉकचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सर्व वयोगटातील ५०० पेक्षा जास्त जेष्ठ नागरीक, महिला, पुरुष, युवक, युवती, मुले यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
रिमझिम पावसात समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात मॅरेथॉन वॉकला रामटेक पोलीस निरिक्षक हृदयनारायण यादव, उमाकांत भुजाडे, डॉ.विलास महात्मे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. पदयात्रा समर्थ विद्यालय, शास्त्री चौक,
कालंका मंदिर, जैन मंदिर, मोठी गडपायरी, शनिवारी वार्ड, कुंभारपुरा, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक या मार्गावरून पार पडली आणि समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात रामराज्य ढोल ताशा पथकाच्या सादरीकरणाने या पदयात्रेची सांगता झाली.
श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या प्रेरणेतून ‘डेली वॉक – बेस्ट हेल्थ’ या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्याबाबतची माहिती सृष्टी सौंदर्य संस्था चे अध्यक्ष ऋषीकेश किंमतकर यांनी दिली.
भारतासोबतच ४२ परदेशात एकाच वेळी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचेही सांगितले. सृष्टी सौंदर्य संस्थेचे सर्व सदस्य, एनसीसी कॅडेट्स चे बाळासाहेब लाड, बेटी बचाओ, बेटी पढाओ ग्रुप चे अजय खेडकरगर, हिमांशू डांगरे ग्रुप,
सोनू बेठेकर ग्रुप, रामराज्य ढोल ताशा पथक चे मोनु रघुवंशी, सृष्टी सोसायटी,जेष्ठ नागरिक मंडळ, वैष्णवी योगा ग्रुप, सीतामाता रसोई सेवा संस्था, सुमित कोठारी मित्र परिवार, समर्थ कॉन्व्हेंट रामटेकचा शिक्षक गट, संस्कृत विद्यापीठ कर्मचारी व शहरवासीयांनी प्रयत्न केले.