रामटेक – राजू कापसे
रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रामटेक येथे भाटी अँड कंपनी, नागपूर तर्फे “मीना बाजार” लावण्यात आलेला आहे.या मीना बाजारात नवीन झुल्यामध्ये टोरा -टोरा , क्रॉस व्हील,जॉइंड व्हील, ड्रॅगन ट्रेन,ब्रेक डान्स,कोलंबस(नाव), पन्नालाल शो सह ४० ते ५० वस्तूचे विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत.यात पायांतील चपलापासून ते डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा समावेश आहे.
मीना बाजारातून आपल्या आवडत्या सणासाठी खरेदी करण्याचा आनंद वेगळाच असतो. लहानपणापासूनची मीना बाजारची प्रतिमा ही जशीच्या तशी डोळ्यांत साठलेली आहे. त्यात होत असलेले नवनवे बदल हवेहवेसे वाटणारे आहेत.
सौंदर्यवतींसाठी पर्वणी
विविध कपडे, रेडिमेड कपडे, विविध प्रकार, मेहंदी ते मस्करा, अत्तर, मेकअपचे कीट, दागिने मिळतात. महागड्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने महिलांचा आनंद द्विगुणित होतो.मीना बाजारात खरेदीचा आनंद वेगळा असल्याचे लक्ष्मी पुरुषोत्तम मेश्राम यांनी यावेळी सांगितले.
अत्तर,संसारोपयोगी भांडी, लहान मुलांसाठी खेळणी, मुंबई चौपाटी सारखे खाद्य पदार्थ मिळत आहेत. यामुळे “मीना बाजारात” रामटेक येथिल नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे संचालक अशरफ भाटी यांनी सांगितले आहे.