रामटेक – राजु कापसे
रामटेक तालूक्यातील देवलापार आदीवासी भागातील बोथिया पालोरा असे हे एक गाव आहे.जिथे होते रावनाची पुजा…अवघ्या भारतवर्षात मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाची पुजा होते आणी त्याचा शत्रू असल्याने रावणाचा दहन केल्या जाते. प्रभु श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला होता..तेव्हापासून दसर्याच्या दिवशी रावणाचं दहन करण्याची परंपरा आहे..
परंतु रामटेक तालूक्यातील बोथिया पालोरा हे गाव याला अपवाद आहे.या भागात आदिवासी समाज आहे राजा रावणाला आपला दैवत म्हणतात रावण हा खुप ज्ञानी होता सदगुणामुळे येथे रावणाची पुजा केली जाते….स्थानीक लोक सांगतात की दरवर्षी दसरा हा सण मोठ्या थाटा माटात साजरा केला जातो या दिवशी गावातील लोक रावणाची पुजा करतात आणी महाआरतीचे आयोजन केले जाते…..तर गावात रावनाची मुर्ती स्थापन केली असून मंदीराची निर्मिती केली आहे..दरवर्षी दसरा निमित्त गोंड सम्राट राजा रावण ऊत्सव व जंगो लिंगो महापुजा व भव्य रैलीचे आयोजन केले जाते.
मंगळवार दिं २४/१०/२०२३ ला सकाळी ११.३० महागोंगो व सप्तरंगी ध्वजारोहण तसेच बुधवारला सायंकाळी ४वाजता महात्मा राजा रावण महारैली काढुन उत्सव साजरा केला जातो..नंतर मनोरंजन कार्यक्रम रात्री गोंडी आर्केस्ट्रा चे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरू.राजे विसुदेवशाह टेकाम राष्ट्रीय उपाध्यक्ष गों.ग.पा कार्यक्रमाचे उद्घाटक मधुकर उईके ऑल इंडिया आ.एम्प्लॉइज फेडरेशन हे राहणार आहेत असे आयोजकांनी सांगीतले आहे..