Friday, November 22, 2024
Homeशिक्षणरामटेक | आर.एम.डी.न.प. शाळेत पारितोषीक वितरण व सत्कार समारंभात थाटात संपन्न...

रामटेक | आर.एम.डी.न.प. शाळेत पारितोषीक वितरण व सत्कार समारंभात थाटात संपन्न…

२०२० -२१-२२ या तिन वर्षातील दहावीतिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

रामटेक शहरातील नगर परीषदेच्या रामजी महाजन देशमुख या शाळेमध्ये आज दि. २३ सप्टेंबर ला पारीतोषीक वितरण व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये सन २०२१, २०२२ व २०२३ या तिन वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यासह या शाळेतुन शिक्षण घेऊन पुढे शिक्षक बनलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना मुळे मागील दोन वर्षात हा सोहळा करता आला नसल्याने यावर्षी तिन्ही वर्षाचा एकत्रीत कार्यक्रम घेत असल्याचे यावेळी रामजी महाजन देशमुख शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद चोपकर यांनी माहीती देतांना सांगीतले.

कार्यक्रमप्रसंगी मंचावर प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन नगर परीषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजीक कार्यकर्ते तथा सृष्टी सौदर्य परीवाराचे अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर, माजी मुख्याध्यापक चौरागडे , माजी शिक्षक मोहड , तुरक सर , कारेमोरे सर , व्यवस्थापन समिती सदस्य श्री गजभिये , श्री चांदपूरकर , सौ चित्रा धुरई आदी. उपस्थीत होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार सोहळा आटोपला. यानंतर मुख्याधिकारी मंगेश वासेकर, ऋषीकेश किंमतकर तथा श्री श्याम गासमवार शिक्षक प्रकाश हायस्कूल कांद्री व सौ नंदा पवार खाडे शिक्षक स्वामी सितारामदास महाराज विद्यालय नागपूर या दोन माजी विद्यार्थ्यांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत.

दरम्यान मुख्याधिकारी वासेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत चुकीच्या गोष्टी टाळुन पुढे जावे असे सांगत मोबाईल तथा इतर विसंगत असलेल्या गोष्टींपासुन स्वतःला दुर ठेवावे. शिक्षकांबाबद आदर राहातो व ठेवावा तसेच प्रत्येकाने आपले गुण अबाधीत ठेवावे अशाप्रकारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर तिनही वर्षातील इयत्ता दहावितील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषीक व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये २०२० एसएससी बोर्ड परीक्षा आभा प्रताप येरपुडे ९५% , आलोक राघवेंद्र येरपुडे ९०%, मयुरी प्रशांत कोहळे ७८%, एसएससी बोर्ड परीक्षा २०२१ श्रेया सुखराम बावनकुळे ९०%, प्रणोती प्रवीण कोहळे ८५%, जानवी राजू येळणे ८४% , २०२२ एसएससी बोर्ड परीक्षा रक्षिता गोपीचंद चौधरी ८५% , श्वेता ताराचंद मोहते ८४%, धनंजय बबलू सलामे ८४%, या विद्यार्थी – विद्यार्थीनींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संचालन श्री प्रकाश उके व सौ मीना खोडके घोडमारे यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर मिलिंद चोपकर व आभार प्रदर्शन सौ स्वाती खैरकर पुनसे यांनी केले. यावेळी उपस्थीतांमध्ये मीनाक्षी लाकूडकर , सौ उन्नती अँथोनी , श्री विजय लांडगे , कुमारी हडपे , सुनील पवार , संदीप दामोदर , मुकेश भांडारकर हे होते. कार्यक्रमादरम्यान स्वागत गीत कुमारी जांभुळे व इतर कर्मचाऱ्यांनी सादर केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: