राजु कापसे
रामटेक
येत्या ६ नोव्हेंबर पासुन त्रिदिवसीय रामटेक महोत्सवाला सुरवात होणार आहे. या महोत्सावाला हजारो भाविक हजेरी लावतात. कुठलीही अनुचित घटना घडु नये,या करिता प्रशासन स्तरावर कार्यरत आहे. योग्य कायदा व सुव्यवस्था योग्य अमलबजावणी करिता नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले.
वैकुंठ चतुरदशीचा पर्वावर रामटेक शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केल्या जात आहे. ४० वर्षांपासून अविरत सुरू आहे. रामटेक शहराला शोभायात्रा मुळे एक विशेष ओळख आहे . त्रिपुरी पौर्णिमेच्याक दिवस अगोदर निघणार्या ही शोभायात्रा स्व. संत गोपालबाबा यांच्या प्रेरणेतून प्रारंभ झाली. भव्य शोभायात्रेचे आयोजन भारतीय जनसेवा मंडळाद्वारे रामटेक तथा नागरिकाच्या साह्याने केल्या जाते.
यावर्षीचा ४१ व्या शोभायात्रा , त्रिपुर – पोर्णिमा ,रामरथ ,मंडई या महोत्सावाच्या पार्श्र्वभुमिवर उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या दालनात सभेचेआयोजन करण्यात आलेले होते. यावेळी तहसिलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरिक्षक प्रमोद माकेश्र्वर, माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे न.प.मुख्याधिकारी मंगेश वासेकर, .शोभायात्रा समितीचेअध्यक्ष रुषीकेश किंमतकर, गोपी कोल्हेपरा, रितेश चौकसे, प्रकाश कस्तुरे, सुमित कोठारी, निर्भय घाटोळे, नितीन चिंतलवार, राहुल कोठेकर,अजय मेहरकुळे, राममंदिराचे मुख्य पुजारी मोहन पंडे, अविनाश पंडे, राम पंडे, अजय खेडकर, शंकर चामलाटे, शेखर बघेले, चंद्रकांत ठक्कर, सुभाष बघेले, नथ्थू घरझाडे,विनायक डांगरे, अजय पी.टी. रघुवंशी, रजत गजभिये, अंलकार टेर्भुणे, अमोल गाढवे, पंकज बावनकर,त्रिलोक मेहर,कुतुबी सर,घरझाडे सर , अशोक सारंग पुरे अनील वाघमारे राहूल पिपरोदे आकाश शहारे आदी