Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | शासकीय मेळाव्याला राजकारणाचे ग्रहण...मेळाव्यातप्रोटोकॉल नुसार कार्यक्रम न झाल्याच्या चर्चा...

रामटेक | शासकीय मेळाव्याला राजकारणाचे ग्रहण…मेळाव्यातप्रोटोकॉल नुसार कार्यक्रम न झाल्याच्या चर्चा…

मेळाव्यात लाभार्थी नागरीकांपेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांचीच संख्या मोठी

राजु कापसे प्रतिनिधी

रामटेक जिल्हा परिषद नागपूर सेस फंड अंतर्गत पंचायत समिती रामटेक पारशिवनी व मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी ‘ ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी ‘ या मेळाव्याचे आयोजन आज दिनांक १९ सप्टेंबरला शहरातील शांती मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले होते. मात्र या मेळाव्याला राजकीयांतर्फे राजकारणाचे ग्रहण लागल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळाली व हा विषय संपूर्ण मेळाव्यातील लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

एस.सी. , एस.टी. , वी.जे. , एन.टी. या प्रवर्गातील लोकांसाठी विशेषतः या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहाबाहेर विविध योजनांच्या लाभासाठी स्टॉल लावण्यात आले होते तर सभागृहामध्ये राजकीय मंडळी तथा पदाधिकाऱ्यांच्या भाषणांच्या फैरी सुरू होत्या. उल्लेखनीय बाब अशी की सभागृहाबाहेरील विविध योजनांच्या स्टॉलवर कुठे चार-पाच तर कुठे एकही लाभार्थी नव्हता तेथील कर्मचारी थक्क बसून लाभार्थ्यांची वाट पाहत होते. मात्र याविपरीत सभागृहात व सभागृहाच्या मागील भागात ग्रामस्थ तथा अधिकारी कर्मचाऱ्यांचा खच भरलेला होता. निरखुन पाहिले तर रामटेक मौदा पारशिवनी तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी , ग्रामसेवक वर्ग , कर्मचारी वर्ग यांचीच संख्या लाभार्थी नागरिकांपेक्षा मोठी दिसून आली तेव्हा या शासकीय मेळाव्यासाठी लागलेला खर्च व्यर्थ गेल्याचे चित्र दिसून आले.

आणखी एक विशेष बाब अशी की या मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तीनही तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय, समाजकल्यान कार्यालय येथील अधिकारी – कर्मचारी आवर्जून हजर दिसले तेव्हा तीनही तालुक्यातील ही सर्व कार्यालये आजच्या दिवशी ओस पडली असणार व कार्यालयीन कामासाठी आलेले ग्रामस्थ, नागरीक आल्या पावली परत गेले असणार यात दुमत नाही. मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसाठी असलेल्या या कार्यक्रमांमध्ये एवढ्या साऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे काय काम हा प्रश्न मेळाव्यात सर्वांनाच पडला. ‘ हा इलेक्शन स्टंट तर नाही ना ‘ या चर्चेला जणू उत आला होता. शासकीय मेळाव्यात प्रोटोकॉल नुसार माजी पदाधिकाऱ्यांचे काय काम अशीही चर्चा सुरू होती. मेळाव्याचा मोठा कालावधी हा राजकीय मंडळी तथा पदाधिकाऱ्यांच्या भाषणबाजीतच निघून गेला. ‘ आमच्या नेत्याने हे केले अन् ते केले ‘ याच विषयाचे ज्यास्तीत ज्यास्त संबोधन उपस्थितांना करण्यात आले.

भाषणबाजीचा कार्यक्रम आटोपताच सभागृहाच्या मागील भागात जेवण सुरू करण्यात आले. तेव्हा सभागृहबाहेर लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉलवर लाभ घेण्यासाठी जाण्याऐवजी लाभार्थी नागरीक जेवणावरच तुटून पडले. एकंदरीत या शासकीय मेळाव्याला राजकारणाचे ग्रहण लागल्याचे दिसून आले. संचालन पंचायत विस्तार अधिकारी सानप यांनी तर प्रास्ताविक समाज कल्याण समितीचे सभापती मिलिंद सुटे यांनी तर आभार प्रदर्शन पंचायत समिती पारशिवनीचे बि.डी.ओ. जाधव यांनी केले. मेळाव्याला माजी मंत्री सुनील केदार , खासदार श्याम बर्वे , आमदार आशिष जयस्वाल , माजी मंत्री राजेंद्र मुळक , पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे , जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकोड्डे उपाध्यक्ष कुंदा राऊत जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे , सतीश डोंगरे , कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक चे सभापती सचिन किरपान , पंचायत समिती रामटेक चे सभापती चंद्रकांत कोडवते यांचेसह विविध पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी तथा नागरीक उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: