राजु कापसे, प्रतिनिधी
रामटेक:- गणेश उत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी रामटेक पोलिसांकडून शहरात पथसंचलन करण्यात आले. गणेश मंडळांनी शांतता राखून गणेश उत्सव साजरा करावा.राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धींगत व्हावा यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या नेतृत्वात रामटेक शहरातून रुट मार्च काढण्यात आला.
पोलीस स्टेशन रामटेक अतर्गत प्रियांश महाजन उपविभागीय अधिकारी , रमेश बरकते उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग रामटेक यांचा मार्गदर्शनात गणेश उत्सव व ईद ए मिलाद निमीत्याने कायदा व सुव्यवस्था राखने कामी रुट मार्च घेण्यात आला सदर रुट मार्च हा पोलीस स्टेशन रामटेक ते शास्त्री चौक ते गांधी चौक ते आंबेडकर चौक असे मार्गक्रमण करीत परत शहर पोलिस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला. सदर रुट मार्च मध्ये प्रशांत काळे पोलीस निरीक्षक , पल्लवी राऊत मुख्याधिकारी नगरपरिषद रामटेक हजर होते तसेच ०७ अधिकारी, १ आर.सी.पी पथक, १ एस.आर.पी प्लाटुन, ५२ अंमलदार, २२ होमगार्ड सैनिक हजर होते.