Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक पारशिवनी टुरिझम हब व्हावे - डॉ. राजेश ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा...

रामटेक पारशिवनी टुरिझम हब व्हावे – डॉ. राजेश ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा…

रामटेक – राजु कापसे

आराखड्याच्या सादरीकरणासह उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांना दिला प्रस्ताव…भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश ठाकरे यांच्या द्वारे प्रकल्प अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पर्यटन मंत्री यांना देण्यात आला.

रामटेक पारशिवनी टुरिझम हब व्हावे – डॉ राजेश ठाकरे यांची मागणी विविध 8 आकर्षक प्रकल्प देणार 10 लोक हजार लोकांना रोजगार.

प्रस्तावित विकास आराखड्यास अंदाजे 1200 कोटींची गरज. अर्धी गुंतवणूक 600 कोटी राज्य सरकार तसेच अर्धी गुंतवणूक 600 कोटी .टुरिझम क्षेत्रातील अनुभवी खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून व्हावी याकरता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा.

सादर प्रकल्पातून होणार रामटेक पारशिवनी चा कायापालट, रामटेक नगरपरिषद तसेच प्रकल्प ग्रामपंचायत चे आवक स्त्रोत वाढणार, महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्याची एक आगडी वेगळी ओळख ठरणार.

मुख्य आकर्षण

  1. रामटेक गड मंदिर परिसरात “लेझर शो – रामायण” प्रकल्प तसेच गड मंदिर रामटेक ”रामायण सर्किटमध्ये” समावेश करणे. यातून मिळेल केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पाच्या सुविधा.
  2. कालिदास स्मारक परिसरात मेघदूत काव्यावर आधारित जागतिक दर्जाचे म्युझिकल फाउंटेन.
  3. श्रीराम मंदिर ते श्री नारायण टेकडीच्या पायथ्याशी रोपवे, श्री नारायण टेकडी ते नागार्जुन मार्गे खिंडसी डॅम पर्यंत शासकीय जागेवर रामटेक तुमसर रोडवर जागतिक दर्जाचे “इंटरटेनमेंट पार्क ‘” त्यामध्ये फनी कॉलर ट्रेन , हिल टॉप ट्रेन,वाईल्ड ऍनिमल पार्क , वॉटर पार्क, आर्किऑलॉजिकल म्युझियम. आंतरराष्ट्रीय राज्याचे हॉटेल्स रिसॉर्ट.
  4. डब्लू सी एल आणि मायल खदान ला पर्यटनाचा दर्जा येथे सुद्धा होईल पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र.
  5. रामटेक पारशिवनी अंतर्गत सर्व जंगली सफारी गेट जवळ आकर्षक हॉटेल्स व कृषी पर्यटनाची सोय.
  6. रामटेक पाराशिवनीतील सर्व ऐतिहासिक धार्मिक स्थळे श्रीराम मंदिर नगरधन किल्ला , कोटेश्वर मंदिर , पारशिवनीतील ् आदिवासी दैवत “कुवारा भिवशन” देवस्थान मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर ,घोगरा महादेव व इतर सर्व देवस्थानांचा विशेष विकास प्रकल्पांतर्गत टुरिझम प्रकल्प समावेश तसेच नागरी सुविधा.

रोपे वे , हिल टॉप ट्रेन, फनी कुलर ट्रेन याच्या आकर्षणामुळे राम मंदिरावर चढणे आणि उतरणे सोयीचे सुद्धा होणार आहे त्यामुळे गर्दी सुद्धा टाळता येईल 7. तीन रेल्वेचे विशेष मार्ग .रामटेक -देवालापार- मध्य प्रदेश.

रामटेक- पारशिवनी- मध्य प्रदेश, रामटेक तुमसर छत्तीसगड असे तीन विविध रेल्वे मार्गे व इतर सर्व नियोजित आकर्षक प्रकल्पातून जास्तीत जास्त पर्यटकांना “रामटेक पारशिवनी टुरिझम हब ” करिता आकर्षित करता येईल व डायरेक्ट इनडायरेक्ट हजारो हातांना तसेच जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार देण्याचे कामकाज या प्रकल्पातून होणार आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: