Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | देशमुख महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न...

रामटेक | देशमुख महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- स्थानिक दमयंतीताई देशमुख बी.कॉलेज, रामटेक येथे संस्थाध्यक्ष रविकांत रागीट सर व प्राचार्या जयश्रीताई देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या ब्रह्मांड सभागृहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत “स्कुल कनेक्ट” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा ०७ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी पार पाडण्यात आली.

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिस्लॉप कॉलेज नागपूरच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख मा.डॉ. मनीषा सोनटक्के मॅडम उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

तसेच याच कार्यशाळेच्या द्वितीय सत्राला रविकांत रागीट प्रशा.महा., रामटेक चे सामान्य अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख मा.प्रा.अमित हटवार सर उपस्थित होते त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चे होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या कार्यशाळेला स्थानिक जनप्रभा महाविद्यालय, रामटेक, रविकांत रागीट प्रशा.महा., रामटेक, दमयंतीताई देशमुख अध्यापक विद्यालय, रामटेक येथील बऱ्याच संख्येत विद्यार्थी व तेथील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

या कार्यशाळेला यशस्वीरीत्या पार होण्यासाठी बी.एड च्या विभाग प्रमुख प्रा.उर्मिला नाईक, प्रा.किरण शेंद्रे, प्रा.मेघा जांभुळकर, प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.अनिल मिरासे,प्रा.शालू वानखेडे, प्रा.मयुरी टेम्भुरणे व विद्यार्थ्यांनी सहकार्य के

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: