रामटेक – राजु कापसे
Ramtek News – दिनांक: १ व २ ऑक्टोबर २०२३ राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या (२ ऑक्टोबर) जयंतीच्या निमित्ताने १ ऑक्टोबरला सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले.
यावेळी शाळेच्या समोरील पेंच धारण परीसरात श्रमदान करून महात्मा गांधींना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोनीराम धोटे यांनी मुलांना श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमात शाळेतील ५ वी ते १२ वीच्या २३० विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
२ ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षक राजीव तांदूळकर, साक्षोधन कडबे, नीलकंठ पचारे, दिलीप पवार, प्रशांत पोकळे, सतीश जुननकर, शैलेंद्र देशमुख, अमित मेश्राम, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, प्रा. अरविंद दुनेदार, प्रा. सुनील वरठी, प्रा. मोहना वाघ, करीना धोटे, कर्मचारी लिलाधर तांदूळकर, गोविंदा कोठेकर, राशिद शेख प्रामुख्याने उपस्थित होते.