राजु कापसे
रामटेक
पारशिवनी-नवेगाव खैरी दि:७/५/२०२४
बॅनियन ट्री फाउंडेशन व राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी द्वारा संचालित राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव मयंकराव देशमुख व बॅनियन ट्री फाउंडेशनचे उपसंचालक संजय करकरे यांचे मार्गदर्शनाखाली ६ व ७ मे रोजी दोन दिवसीय उन्हाळी निसर्ग संस्कार शिबीर घेण्यात आले. या शिबिरात वाढत्या तापमानामुळे पक्षांच्या जीवाला असलेला धोका, मृत्यूचे प्रमाण, पक्षी संरक्षण व संवर्धनासाठी उपाय, पेंच प्रकल्पातील प्राण्यांची ओळख या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ‘टाकाऊ खर्ड्यापासून घरटे निर्मिती, पक्षी पाणपोई तयार करणे, सीडबॉल निर्मिती’ याबाबत मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या काही पाणपोई व घरटे शाळेच्या आवारात बांधण्यात आले तसेच मुलांना वितरित करण्यात आले. बॅनियन ट्री फाउंडेशनचे शिक्षणाधिकारी आकाश लोनबैले व शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली.
यामध्ये निसर्गदूत सक्षम सोनेकर, वंशिका सावरकर, प्रतीक्षा तुपट, आरुषी भागडकर, त्रिवेणी परतेती, वंशिका ठाकरे, दिव्या दाढे, पूर्वी वझाडे, ज्ञानेश्वरी मोहनकर, पौर्णिमा मेंढेकर, समृद्धी सोनटक्के, अश्रुता भोयर, राणू ठाकूर, दीक्षा तुपट, समीक्षा दुपारे, प्रीती धुर्वे, रंजना टेकाम, श्रावणी ढोंगे, दीपांशू पंधराम, रोहित मुंगभाते, अनिकेत पूरकाम आस्तिक नराटे, कार्तिक राऊत, पियुष राऊत, नेहर राऊत, नैतिक ढोरे, संकेत ढोरे, अनिकेत परतेती, साहिल बेद्रे, सुजल ढोरे, वेदांत मोहनकर, पंकज धुर्वे, आराध्या गजम, अनिरुद्ध शेंडे, गोविंद चक्रवर्ती, मोहित चक्रवर्ती पवन ढोरे, श्रवण ढोंगे, अंशुल तुपट आयुष ढोरे, उत्कर्ष राऊत, हिरण्य राऊत, अंशुल राऊत असे ५३ विद्यार्थी सहभागी होते. शाळेद्वारा दोन्ही दिवस मुलांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य केले व स्वयंपाकी शिपाई राशिद शेख, मोरेश्वर दुनेदार यांनी मोलाचे प्रयत्न केले.