Friday, December 27, 2024
Homeराज्यरामटेक | राष्ट्रीय मतदार नोंदणी आढावा सभा संपन्न...

रामटेक | राष्ट्रीय मतदार नोंदणी आढावा सभा संपन्न…

महाविद्यालयीन स्तरावर मतदार नोंदणी ताबडतोब शंभर टक्के पूर्ण करावी.- श्रीमती वंदना सवरंगपते,उपविभागीय अधिकारी, रामटेक यांचे प्राचार्यांना निर्देश

रामटेक – राजु कापसे

दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी रामटेक तालुक्यातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राष्ट्रीय मतदार नोंदणी आढावा सभा तहसील कार्यालय रामटेक येथे श्रीमती वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात संपन्न झाली.मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी महाविद्यालयीन स्तरावर शंभर टक्के पूर्ण करावी अशी सूचना करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी वोटर हेल्पलाईन ॲपवर किंवा ऑफलाईन अर्ज भरून ताबडतोब महाविद्यालयात नोंद करावी. अर्जासोबत स्पष्ट फोटो, आधारकार्ड,शाळा सोडल्याचा दाखला, स्पष्ट पत्ता असलेल्या सत्यप्रत पुरावा म्हणून जोडून लवकरात लवकर सादर करावे असे आवाहन करण्यात आले. तालुक्यातील महाविद्यालय स्तरावर आवश्यकता असल्यास शिबिर आयोजित करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले.

या महिन्याच्या शेवटपर्यंत नोंदणीची संधी असल्याकारणाने ही राष्ट्रीय मतदार नोंदणीची मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सभेला बार्टीचे रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड, वरिष्ठ पत्रकार नत्थुजी घरजाळे, महेश मावळे, जयप्रकाश दिवटे,अनिल मिरासे,देवानंद नागदेवे, चंद्रशेखर पौनिकर,राजेंद्र कांबळे,प्रभाकर बागडे,संतोष जेनगाथे,शुभम कांबळे आदी महाविद्यालयाचे प्रतिनिधी, प्राचार्य, नोडल अधिकारी व लिपिक कर्मचारी सभेला उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: