Tuesday, December 24, 2024
HomeUncategorizedरामटेक | नारायण टेकड़ी येथे नारायण स्वामी पुण्यतिथी महोत्सव १८ पासुन...

रामटेक | नारायण टेकड़ी येथे नारायण स्वामी पुण्यतिथी महोत्सव १८ पासुन…

रामटेक – राजू कापसे

रामटेक – प्रसिद्ध धार्मिक स्थळ रामटेकच्या अंबाळा नारायण टेकडीवर श्री सद्‌गुरू नारायण स्वामी व श्री दत्तगुरू बालयोगी छोटूबाबा यांच्या 9 दिवसीय पुण्यतिथी महोत्सव 18 ते 26 डिसेंबर विविध्य कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे. सुश्री साध्वीजी महाराज यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात होईल.

येथे 500 वर्षा पूर्वीची सद्‌गुरू नारायण स्वामीची संजीवनी समाधी आहे. 18 ते 26 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येक दिवसी सकाळी 9 वाजता समाधी अभिषेक, 9 दिवस ओम नमो नारायणाचा संगीतमय अखंड नामजप तसेच सकाळी 11 वाजता भाविकांसाठी निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन केले जाईल.

या प्रत्येक दिवसी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसाद राहिल। विशेष बाब म्हणजे महोत्सवात सेवक स्वतः महाप्रसाद तयार करतात. नऊ दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे 26 डिसेंबरला गोपालकाल्याने समारोप होईल.

महोत्सवात जिल्ह्यासह राज्यातून, इतर राज्यातून संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने साधक भाविक भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात. आयोजनासाठी सुश्री साध्वीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात हजारों साधक प्रयत्नरत राहतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: