हजारो ज्योतींनी उजळला अंबाळा तलाव परिसर…महोत्सवादरम्यान हजारो नागरीकांची गर्दी
रामटेक:(तालुका प्रतिनिधी) प्रख्यात अंबाळा तिर्थक्षेत्र येथे आज दि.३० मे च्या सायंकाळी ‘ माॅ गंगा दशहरा दिप महोत्सव ‘ मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला. यावेळी येथे मॉ गंगेची आरती व विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले. दरम्यान हजारो दिपक अंबाळा तलावात सोडण्यात आले होते. हे दृष्य पहाता हजारो दिपकांच्या प्रकाशात अवघा अंबाळा तलाव अक्षरशः उजळुन निघाल्याचे चित्र नागरिकांना पहावयास मिळाले.
भारतीय जनसेवा मंडळ रामटेक, माॅ गंगा दशहरा दिप महोत्सव समिती, श्री क्षेत्र अंबाळा ब्राह्मण वृंद तसेच अंबाळा व रामटेक येथील भावीक भक्तगण तथा नागरीकांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र अंबाळा येथे काल दि. ३० मे ला सायंकाळच्या सुमारास ‘ माॅ गंगा दशहरा दिप महोत्सव ‘ चे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ब्राम्हणवृंदांकडुन मॉ गंगेची विधीवत पुजा अर्चना झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम झाला. यानंतर मान्यवरांना दोन शब्द बोलण्याची संधी देण्यात आली.
यात भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव तथा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर भारतीय जनसेवा मंडळाचे ऋषिकेश किंमतकर यांचे प्रास्ताविक भाषण झाले. त्यानंतर माॅ गंगेची आरती करण्यात आली. यावेळी आरतीचा ध्वणी संपुर्ण परीसरात गुंजुन राहालेला होता. सरतेशेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचालन मोहन कोठेकर तथा अमोल गाढवे यांनी केलेले होते. यावेळी उपस्थितांमध्ये भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव मल्लीकार्जुन रेड्डी, संत तुकाराम बाबा, महंत कैलास पुरी महाराज, शिवानंद महाराज, महंत विष्णुगिरी महाराज, मनोज योगी महाराज, ऋषिकेश किंमतकर, डॉ. अंशुजा किंमतकर, पोलिस निरीक्षक हदयनारायण यादव, गोपी कोल्हेपरा, ज्योती कोल्हेपरा, नाना उराडे, विवेक तोतडे, शेखर बघेले, मोहन कोठेकर, नंदकिशोर पापडकर, प्रभाकर खेडकर, संजय बिसमोगरे, अजय खेडगरकर, नलीनी चौधरी, माकडे सर, पुंड सर, मनोहर बावनकर सर, पुरुषोत्तम मानकर तथा शेकडो महिला पुरुष बालगोपाल उपस्थीत होते.