रामटेक – राजू कापसे
रामटेक – मागील २०१६ पासून प्रयोगशाळा सहाय्यकांना ७व्या वेतन आयोगात १२ वर्षानंतर ची वेतन निश्चिती चुकीची झाल्यामुळे आर्थिक अन्याय होत होता. याच विषयाच्या संबंधाने राज्य महासंघाने मंत्रालय स्तरावर अनेक वेळा निवेदन देऊन झालेला आर्थिक अन्याय कसा दूर करता येईल याबाबत अनेक वेळा निदर्शनास आणून दिले परंतु याचा फारसा उपयोग झालेला दिसत नव्हता.
त्यामुळे मागील एक वर्षापासून गडचिरोलीचेभास्करराव कायते,नागपूरचे ज्ञानेश्वर उंमरे, फ्रान्सिस जोसेफ,वैद्य सर, वर्धेचे अहीव सर, राज्य महासंघ महिला संघटिका दारोकर मॅडम, गायकवाड सर, व इतर पदाधिकारी मिळून विभागीय स्तरावर साहाही जिल्ह्यात सभा घेऊन मुंबईला मंत्रालय स्तरावर दोनदा भेटी देऊन निवेदन देऊन ०१/०१/२०१६ पासून कसा अन्याय झाला याचा सतत पाठपुरावा करून हे सगळे करीत असताना, कुटुंबाचा विरोध पत्करून, आर्थिक नुकसान सहन करून आमच्या तीन जिल्ह्यातील प्रयोगशाळा सहाय्यकांना आर्थिक नुकसान कसे होत आहे.
असे निदर्शनास आणून दिले.या एक वर्षाच्या काळात आमच्या प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये अनेक वेळा समज- गैरसमज सुद्धा झाले त्या- त्यावेळी भास्कर कायते, ज्ञानेश्वर उमरे सर, जोसेफ सर वैद्य सर, दारोकर मॅडम, अहीर सर यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना धीर देण्याचा व संयम राखण्यासाठी समजुत घालण्याचे काम करावे लागले. शेवटी सर्वांना समजले की आपल्यावर झालेला अन्याय दूर होणारच आहे.या अथक परिश्रमातून झालेल्या अन्याय दूर करून देण्याच्या कार्याबद्दल उंमरे सर, श्रीमान कायते सर जोसेफ, सर अहीव सर, दारोकर मॅडम, गायकवाड सर तसेच इतर पदाधिकारी यांचे राज्य महासंघाचे अध्यक्ष जगताप सर कुकडे सर भैसारे सर, आत्राम सर यांनी मोलाचे सहकार्य केले