रामटेक तालुका प्रतिनिधी, राजू कापसे
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेतली. या परिषद मध्ये सांगितलेल्या माहितीनुसार रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत देवलापर येथे लवकरच क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा मार्केट यार्ड सुरू होणार आहे. यामध्ये विशेषता बकरा मंडी व भाजीपाला बाजारांच्या समावेश राहणार आहे.
आदिवासी बहुल भागात दुरून दुरून व्यापारी येऊन बकऱ्यांची खरेदी करतात परंतु कधीकधी विक्री दाराला बकऱ्यांच्या योग्य तो भाव मिळत नाही त्याकरता खरेदीदाराला योग्य ते वजन आणि विक्री दाराला योग्य तो भाव मिळावा म्हणून बकरा मंडी ची सुरुवात देवलापर येथे सुरू होणार आहे.तसेच शेतकऱ्याला त्यांच्यामाल विकण्यासाठी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून त्यांच्या सुख सोयीसाठी तसेच त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च वाचवण्यासाठी भाजीपाला बाजाराची सुरुवात होणार आहे.
या उपबाजारासाठी व्यापारी व आडतीया नियुक्त करायचे आहेत यासाठी या भागातील इच्छुकांनी लायसन्स साठी कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक या मुख्य कार्यालयात संपर्क साधावा, पहिल्यांदाच असे खुले जाहीर आव्हान रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यात आलेले आहे असे सभापती सचिन किरपान यांनी सांगितले. या उपबाजाराकरिता लिलाव शेडचे टेंडर दिलेले आहे कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बकरा मंडी साठी आवश्यक ती सुविधा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पानाची सोय 6000 स्क्वेअर फिट मध्ये गोडाऊन ची सोय या उप बाजारात करण्यात येणार आहे. देवलापार सेवा सहकारी सोसायटी ला दहा हजार स्केअर फिट जागेची मागणी करण्यात आलेली आहे तेही काम लवकरच पूर्ण होण्याची माहिती सचिन किरपान यांनी पत्रकार परिषदेत दिली. आजच्या या परिषदेत त्रिलोकचंद जी मेहर, नकुलजी बरवटे, वीरेश जी आष्टणकर, भीमरावजी आंबीलडुके, बाजार समितीचे सचिव हनुमंताची महाजन उपस्थित होते.