- लाच प्रतिबंधक विभागाची कार्यवाही
- चाचेर तलाठी कार्यालयातील ट्रॅप
रामटेक – राजु कापसे
रामटेक – तक्रारदार यांचे वडिलांचे मृत्युपत्रानुसार वडिलोपार्जित शेतीचे सातबारावर फेरफार नोंद करून नाव समाविष्ट करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणार्या महिला तलाठीसह कोतवालाला लाच प्रतिबंधक विभागाने आज चाचेर येथील तलाठी कार्यालयात रंगेनाथ अटक केली. सौ. सुनीता नेमीचंद घाटे तलाठी वय ५४ व किशोर वानखेडे वय ५४ वर्ष कोतवाल अशी आरोपींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांचे वडिलांचे मृत्युपत्रानुसार वडिलोपार्जित शेतीचे सातबारावर फेरफार नोंद करून नाव समाविष्ट करण्यासाठी तक्रारदार हे आरोपी तलाठीकडे गेले असता तक्रारदाऱ यांना ३००० रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. तेव्हा आज दि. २२ नोव्हेंबर ला चाचेर येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान कोतवालाने तलाठी कार्यालय चाचेर येथे तक्रारदाराकडून २००० दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारून तलाठी यांच्याकडे सुपूर्द केली.
तेव्हा पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता लाच रकमेची मागणी करून लाच रक्कम स्विकारली असल्याचे सिद्ध झाले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून,पोलीस स्टेशन रामटेक,नागपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
श्री. शिवशंकर खेडेकर पोलीस निरीक्षक, श्री प्रवीण लाकडे पोलीस निरीक्षक , नापोशी सारंग बालपांडे , मनापोशी. अस्मिता मल्लेलवार, मनापोहावा आशु श्रीरामे , चालक शारीरिक अहमद सर्व ला. प्र. वी.नागपूर यांनी ही कारवाई केली आहे.