Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक किट्स कॉलेजला नॅक कडून ए(A)दर्जा...

रामटेक किट्स कॉलेजला नॅक कडून ए(A)दर्जा…

रामटेक स्थित कविकुलगुरू इंस्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी अँड सायंस अभियांत्रिकी महाविद्यालयला 31 मे 2024 ला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) ने ए दर्जा जाहिर केला.nनुकतीच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) चमूने भेट देवून किट्स अभियांत्रीकीच्या गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, सोयी, संधी, हरीत उर्जा, स्वच्छ परिसर, अग्नीशमन यंत्रणा सहित इत्यादिच्या तपासणीचे कार्य केले.

भेट दिलेल्या चमू मध्ये
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद चमूचे अध्यक्ष, नॅक समन्वयक सदस्य, समिती सदस्य होते. या चमूने सर्व विभागाला भेट देवून त्यांनी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. यशवंत जीभकाटे, अधिष्ठाता, विविध विभागाचे विभाग प्रमुख,यांच्याशी होत असलेल्या कामाची चर्चा केली व तपासणी केली.

नॅकच्या चमूने संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी सुद्धा प्रत्यक्ष संवाद साधला. सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते.

समारोपीय कार्यक्रमात समीतीचे अध्यक्ष यानी संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता किट्स महाविद्यालयाने केलेल्या कार्याची प्रशंसा केली. संस्थेचे सचिव व्ही. श्रीनिवास राव व कार्यकारी संचालक व्ही. प्रणव यांनी प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे, आयक्यूएसी समन्वयक डॉ यशवंत जिभकाटे,महाविद्यालयाची नॅक टीम व सदस्य, डीन, विभाग प्रमुख , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक केले।

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक )ही संस्थानांच्या गुणवत्ता द‌र्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय व इतर मान्यताप्राप्त विद्यालय, त्यांच्या उच्च स्तरावरील शिक्षण मूल्यांकन व मान्यता व्यवस्था करते. नॅक शैक्षणिक प्रक्रियांचे व त्याच्या परिणामांचे अनुसंधान, सुविधा, आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधाच्या संबंधित संस्थांच्या कार्यास संबंधित गुणवत्तासाठी शेक्षणिक संस्थांना मूल्यांकन करत असते.

या संस्थेचे प्रमुख कार्य शिक्षणाच्या गुणवत्ते मध्ये सुधारणा करणे, उच्च शैक्षणिक संस्थामध्ये अध्यापन शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देन्यासाठी शैक्षनिक वातावरणाला प्रोत्साहन देणे. उच्च शिक्षणात स्वयंमुल्यमापन नवकल्पनांना प्रोत्साहन देवासाठी दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम घेने हे आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: