Thursday, September 19, 2024
Homeराज्यरामटेक | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची भव्य कार रॅली

रामटेक | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची भव्य कार रॅली

रामटेक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची विदर्भातील पहिली शाखा म्हणून उत्तर नागपूर शाखेचा मोठ्या गौरवाने उल्लेख केला जातो. या शाखेचे ची स्थापना दि 21 सप्टेंबर 2014 ला झाली आज हे चळवळीचे आधारवड झाले असून विदर्भात अनेक शाखांचे जाळे कार्यरत आहे. उत्तर नागपूर शाखेचा आज 10 वा वर्धापन दिवस आहे . त्यानिमित्त भव्य कार रॅली चे आयोजन करण्यात आले असून, भीम चौक येथील प.पू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करुन शनिवार दि.21.09.2024 ला सकाळी 8 वा कार रॅली रवाना होईल .

मा. उपायुक्त सामाजिक न्याय विभाग डॉ.सिद्धार्थ गायकवाड या कार रॅली ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. या वेळी ठाणेदार पो.स्टे. जरीपटका व ठाणेदार पो.स्टे. कपीलनगर प्रामुख्याने उपस्थित रहातील. कार रॅलीत 15 कार बैनर , झेंडे,पोस्टरने सजलेल्या असून, पो.स्टे.जरीपटका ऍटोमेटीव्ह चौक, पो.स्टे.कामठी, संत कबीर वाचनालय, पो. स्टे. कन्हान , मनसर मार्गे रामटेक ला पोहचेल .ही कार रॅली मार्गक्रमणातील पो. स्टे. ला व ठिकठिकाणी जनसभेला संबोधित करेल व नंतर रामटेक ला3.30pm ला पोहचेल रामटेक शाखेच्या आतिथ्यात शहरातील प्रमुख रस्त्यावरुन मार्गस्थ होत डॉ आंबेडकर चौकात रॅलीचे सभेत रुपांतरीत होईल.या वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे विविध जनप्रबोधन कार्यक्रम, जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रबोधन , चळवळीचे गीत सादर केले जातील .या वेळी प्रसिद्ध नाटक “जोतिबा का संघर्ष” या नाटकाचे मंचन होईल .

या कार रॅली ला मा.आयुक्त नागपूर शहर व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांची परवानगी लाभली असून वाहतूकी च्या सर्व नियमांचे पालन केले जाईल . तरी या भव्य कार रॅलीचे साक्षीदार होणे साठी सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक,समविचारी यांनी सामील होऊन कार रॅली ऐतिहासिक करावी असे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, चित्तरंजन चौरे, अध्यक्ष ओमप्रकाश आष्टांकर उपाध्यक्ष नानाभाऊ उराडे, कार्याध्यक्ष कांचन माकडे,सचिव विद्या मून. प्रसिद्धी प्रमुख नथुजी घरजाळे, मोरेश्वर माकडे.,राहुल जोहरे, भाऊराव भीलावे.रामटेक शाखेनी केले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: