Tuesday, September 24, 2024
Homeराज्यरामटेक | उपाययोजनांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार...आमदार जयस्वाल...

रामटेक | उपाययोजनांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार…आमदार जयस्वाल…

रामटेक/ प्रतिनिधी :

झिंझेरिया येथील महिलेला वाघाने ठार केल्यानंतर देवलापार क्षेत्रातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याबाबत, व्याघ्र प्रकल्पातील अधिकचे वाघ स्थलांतरित करून इतर ठिकाणी. हलवण्यात यावे,जंगलात जाण्यास परवानगी द्यावी आणि जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती वापरण्यास परवानगी द्यावी,डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा शासन निर्णय रद्द करावा आणि बफरझोन अंतर्गत स्थापित केलेल्या गावातील समित्या रद्द करण्यात यावे, वन हक्क कायदा २००६ चे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, वन विभागामार्फत प्रत्येकी व्यक्तीचे २५ लक्ष रुपयांचे जीवन बिमा शासन मर्फत करण्यात यावे, बफर झोन व मानसिंगदेव अभयारण्य रद्द करण्यात यावा, जंगल क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांना पिक नुकसान एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी व क्षेत्रातील नागरिकांच्या असणाऱ्या विविध समस्यांविषयी,मागण्यांसंदर्भात २३ सप्टेंबरपासून देवलापार अप्पर कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी २४ सप्टेंबरला दुपारी रामटेक चे आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांनी उपोषणस्थळी भेट दिली व समस्या जाणून घेतल्या.देवलापार क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यांबाबत आमदारांनी गंभीर चिंता व्यक्त करून शासनस्तरावर कार्यवाहीबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली. यासह नागरिक व उपोषणकर्त्यांनी त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भात आमदार जयस्वाल यांना अवगत केले.आवर आमदारांनी योग्य कार्यवाही करण्याचा विश्वास उपोषणकर्त्यांना दिला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शांता कुमरे, शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, पंचायत समिती सभापती चंद्रभान कोडवते, मुकेश पेंदाम, ग्राम पंचायत वाडांबा सरपंच मुकेश दुबे, वरघाट सरपंच देवराज इनवाते, पिपरीया सरपंच प्रवीण उईके, डोंगरताल सरपंच उपेश उईके,रोमीत गुप्ता, शेखर खंडाते, आकाश पंधरे, राजु जैस्वाल, हर्षानंद उईके, स्वप्निल सर्याम,प्रवीण उईके,संदीप कुमरे,अमोल कुमरे,चंद्रकांत वरठी,चिंतामण वरखडे एमएचबी ग्रुपचे सदस्य व क्षेत्रातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: