Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | पदाधिकाऱ्यांकडून मागणी करूनही निधी मिळत नाही...

रामटेक | पदाधिकाऱ्यांकडून मागणी करूनही निधी मिळत नाही…

  • माजी आमदार रेड्डींचा पत्रपरिषदेत आरोप…
  • डी.पी.सी. तथा जि.प. निधी मिळता मिळेना…

रामटेक – राजु कापसे

रामटेक विधानसभा क्षेत्रातील अनेक भाजपा समर्थित ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समीती पदाधिकारी तथा नगर पंचायत तथा नगरपरीषद पदाधिकारी मागणी करूनही त्यांना निधी मिळत नाही याबाबदची खंत माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी शहरातील किराड भवन येथील कार्यालयात काल दि. १ जुन रोज शनिवार ला व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की मागील ३० वर्षा पासुन रामटेक लोकसभा क्षेत्रात युतीचा उम्मेदवार असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदाराला रामटेक नागपुर ग्रामीण क्षेत्रातुन भारतीय जनता पार्टी समर्थन देवुन निवडुन आणत आहे. शिवसेने चा फक्त रामटेक सोडुन इतर विधानसभा क्षेत्रात नागपुर जिल्हा आमदार १. जिल्हा परिषद सदस्य १, पंचायतसमिती सभापती १ आहे. परंतु भाजपा चे ३ आमदार, जिल्हा परिषद सदस्य १६, पंचायत समिती सभापती ३ आहेत.

नगर परिषद/नगर पंचायत अस्तिवात असतांना नागपुर ग्रामीण ला २२० न.प. सदस्य होते. तसेच अनेक ठिकाणी नगर पंचायत व नगर परिषद अध्यक्ष सुद्धा आहेत. म्हणुनच सध्या रामटेक विधान सभा क्षेत्रात भाजपा चे वर्चस्व कायम आहे. मागील ग्राम पंचायत निवडणुकी करीता सर्वात जास्त ग्राम पंचायत भाजपा समर्थीत सरपंच / सदस्य निवडुन आलेले आहे. तसेच रामटेक विधानसभा क्षेत्रात तीन जि. प. सदस्य, २ पं.स. उपसभापती सह ३ पं.स. सदस्य आहेत.

तरीही त्यांच्या निधीबाबदच्या मागण्या पुर्ण केल्या जात नाही याचे नवल वाटत असल्याचे रेड्डी म्हणाले. तेव्हा ग्रामीण क्षेत्राच्या विकासा करीता डी.पी.सी. निधी रामटेक विधान सभा क्षेत्रातील विविध कामा करीता जास्तीत जास्त प्रमाणात देण्यात यावा अशी मागणी रेड्डींनी दिलेल्या एका प्रेसनोट वरून केलेली आहे.

निम्माच निधी झाला उपलब्ध
महाराष्ट्र राज्यात युती सरकार आल्यापासुन दोन वर्षात रामटेक ला भाजपाचे जनप्रतिनिधी ने निम्मा निधी उपलब्ध करून दिला. सध्या जिल्हा परिषदेवर कब्जा कांग्रेस पक्षाचा असल्यामुळे जि. प. कडुन भेदभाव केला जात असल्याची खंत रेड्डींनी यावेळी व्यक्त केली. तसेच डी.पी.सी. निधीचा वाटप आमदार, खासदाराचा शिफारिशीच्या कामावर निधी मंजुर होतात. जि. प. सदस्य, पं. समिती सदस्य. न.प./न. पंचायत यांनी निधी मागणी करून सुध्दा मिळत नाही असेही रेड्डी म्हणाले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: