कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक द्वारा संचालित Center for Outreach Programme तर्फे आता विसाव्याचे क्षण हा मनसर वृद्धाश्रम येथील वृद्धांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीर व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष सन्माननीय कुलगुरु प्रो. मधुसूदन पेन्ना , प्रमुख उपस्थिती म्हणुन कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, प्रो. हरेक्रुष्ण अगस्ती संचालक शैक्षणिक परिसर, डॉ. अंशुजा किंमतकर , Center for Outreach Programme च्या संचालिका प्रो. ललिता चंद्रात्रे, प्रो. पराग जोशी, डॉ. जयवंत चौधरी, वित्त व लेखा अधिकारी श्री कैलाश मून, ग्रंथपाल डॉ. दिपक कापडे उपस्थित होते. जेष्ठ व वृद्धांची सेवा करणे हे आमचे आद्य कर्तव्य असून विश्वविद्यालयाद्वारे ही सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली जाईल, असे सन्माननीय कुलगुरु प्रो. मधुसूदन पेन्ना यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले. आरोग्य तपासणी शिबीरात एकुण 22 वृद्धांची तपासणी करून त्यांना औषधी वाटप करण्यात आले.
त्यानंतर त्यांच्यासाठी संगीत कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सादरीकरण हरिओम भजन मंडळ परसोडा यांनी केले. यावेळी उपस्थित जेष्ठांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद अलौकिक आनंददायक अनुभूती देणारा होता. यावेळी प्रशासकीय अधिकारी, अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो.ललिता चंद्रात्रे यांनी केले. संचालन प्रा. योगिता गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” या हृदयस्पर्शी गीताने करण्यात आली.