Monday, December 23, 2024
Homeराज्यRamtek | चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहनाचा अपघात...मरारवाडी शिवारातील घटना...चिमुकलीसह चार जण...

Ramtek | चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहनाचा अपघात…मरारवाडी शिवारातील घटना…चिमुकलीसह चार जण गंभीर जखमी…

राजु कापसे
रामटेक

Ramtek : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मरारवाडी शिवारात चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उतरल्याने वाहन क्षत्रिग्रस्त झाले.यात वाहनातील चिमुकलीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार,चारचाकी वाहन क्रमांक टी. एस.०७ के.सी.०४३६ ही नागपूर कडून जबलपूर कडे जात असताना मरारवाडी शिवारात येताच चालकाला झोपेची डुलकी आली.यात त्याचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उतरले.यात वाहन मोठ्या प्रमाणात क्षत्रिग्रस्त होऊन वाहनातील प्रवाशांना गंभीर इजा झाली.
घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील व्यवस्थापक अतुल आदमने यांना देण्यात आली.त्यांच्या मार्गदर्शनात डॉ.हनवत,प्रवीण ठाकूर,दीपक भीमटे यांच्यासह घटनास्थळ गाठले व जखमींना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले.प्राथमिक उपचार करून दोघांना नागपूर मेडिकल येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: