Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | अखेर नेहरू मैदानावर आठवडी बाजार भरण्यास बंदी...

रामटेक | अखेर नेहरू मैदानावर आठवडी बाजार भरण्यास बंदी…

  • नेहरू मैदानाचा होणार कायापालट, बनणार ‘क्रिडा स्टेडीयम’
  • नगर परिषद प्रशाषणाचा सुयोग्य निर्णय
  • खेळाडु, क्रिडाप्रेमींसह नागरीकांनी केले निर्णयाचे स्वागत

रामटेक – राजु कापसे

शहरातील जुने तथा भव्य मैदान म्हणुन नेहरू मैदानाला गणल्या जाते. येथे 26 जानेवारी ला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासह विविध क्रीडा स्पर्धा क्रिकेट स्पर्धा यांचे आयोजन केले जाते तसेच मॉर्निंग वॉक तथा वाहन शिकणे आदी.

गोष्टी या मैदानावर पार पडत असतात असे असले तरी मात्र गेल्या काही वर्षांपासून या मैदानाची अवस्था फार दयनीय झालेली होती. मैदानावरच आठवडी बाजार भरत असल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचा पसारा तसेच रात्रीच्या सुमारास मद्यपींच्या दारूच्या बाटलांची काचे आदींचे साम्राज्य राहत होते याचा सर्वात जास्त फटका येथे विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना बसत होता मात्र आता या मैदानावर आठवडी बाजार भरण्यास बचाव करण्यात आलेला असून येथे विविध विकासात्मक बाबी होणार असल्याची माहिती नगरपरिषद रामटेक च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी दिली.

गेल्या दोन वर्षात तर येथे मद्यपींनी चांगला धुडगूस घातलेला होता . मद्यपी रात्रीच्या सुमारास मद्य सेवन करून दारूच्या बाटल्या येथेच फोडत होते. त्यामुळे खेळाडूंसह मॉर्निंग वॉक, इव्हीनींग वॉक करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता तसेच याच मैदानावर आठवडी बाजार भरत असल्यामुळे ठिकठिकाणी मातीचे उंचवटे व कचऱ्याचा पसारा पडलेला राहत होता. तसेच मैदानावर सर्वत्र दुर्गंधीचा वास निर्माण होत होता.

यामुळे विशेषता खेळाडूंना कमालीचा त्रास होत होता. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 19 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान याच नेहरु मैदानावर ‘ श्रीराम महासंस्कृती महोत्सवाचे ‘ आयोजन करण्यात आलेले होते तेव्हा महोत्सवाच्या काही दिवसापूर्वी या मैदानाला स्वच्छ, सुसज्ज तथा गुळगुळीत करण्यात आले होते.

यात निधी सुद्धा तेवढाच खर्च झालेला असावा यात शंका नाही. तेव्हा स्वच्छ, सुसज्ज व गुळगुळीत करण्यात आलेल्या मैदानाची पूर्वीसारखी दयनीय अवस्था होऊ नये यासाठी आता स्थानिक नगर परिषद प्रशासनाने टोकाचे पाऊल उचलले असून सर्वात प्रथम येथे आठवडी बाजार भरण्यास बंदी करण्यात आलेली आहे.

भविष्यात मैदानाच्या सभोवताल लाईट्स लावण्यात येणार असून रात्रीच्या सुमारास घडणारा मद्यपींच्या धुडगुसाला चाप बसणार हे नक्की. येथे लवकरच विविध विकासात्मक बाबी घडून येणार असुन लवकरच हे मैदान एक भव्य स्टेडियम बनणार आहे.

मैदानाचा होणार कायापालट – आमदार जयस्वाल

गेल्या काही दिवसांपुर्वी शहरातील दिप हॉटेल येथे पार पडलेल्या आमदार आशिष जयस्वाल यांच्या पत्रपरीषदेत आमदार जयस्वाल यांनी नेहरू मैदानाची होत असलेली दयनीय अवस्था यावर खंत व्यक्त केली होती तसेच या मैदानावर रविवारच्या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजाराला इतरत्र हलविण्याचे तथा मैदानाच्या सभोवताल लाईट्स लावुन मैदानाला स्टेडिअम चे स्वरूप देण्याचे सुचक आमदार जयस्वाल यांनी दिले होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: